Ahmednagar Bjp:  भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब भुजबळ यांची निवड

Ahmednagar Bjp:  भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब भुजबळ यांची निवड


      Ahmednagar Bjp:  अहमदनगर (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टीच्या विविध उपक्रमात तसेच ओबीसींच्या प्रश्नांसाठी नेहमीच पुढाकार घेणारे बाळासाहेब भुजबळ यांच्या कार्याची दखल घेऊन शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या शिफारशीनुसार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी बाळासाहेब भुजबळ यांची ओबीसी मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली.

     बाळासाहेब भुजबळ अनेक वर्षांपासून ओबीसी समाज संघटीत करण्याचे कार्य करीत आहेत. तसेच गेल्या तीन वर्षापासून ओबीसी, व्हिजेएटी, जनमोर्चा या संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून नगर जिल्हात ओबीसी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशिल आहेत.नगरमध्ये झालेल्या ओबीसी मेळाव्यात त्यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे.  ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी वेळप्रसंगी लढा उभारुन आंदोलन ही केले आहेत. ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या माध्यमातून ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आंदोलन केले आहे.

     या नियुक्तीनंतर श्री.भुजबळ म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंत्री आ,राम शिंदे, अहमदनगर विधानसभा प्रमुख भैय्या गंधे, माजी शहराध्यक्ष वसंत लोढा, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले यांच्या नेतृत्वाखाली मी काम करणार आहे. पदाच्या माध्यमातून पक्षाचे ध्येय धोरण जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे,असे बाळासाहेब भुजबळ यांनी सांगितले.

      या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.