चिचोंडी पाटील मध्ये  हरिनाम सप्ताहाची सांगता 

चिचोंडी पाटील मध्ये  हरिनाम सप्ताहाची सांगता


                  अहमदनगर (प्रतिनिधी) -चिचोंडी पाटील येथील संगम मित्र मंडळ  गणेश उत्सवामध्ये गेली  27 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन स्वप्नील महाराज पवार व बबन महाराज बहिरवाल,यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाते,एक वेगळी परंपरा यावर्षी पण जपण्यात आली धार्मिक व अध्यात्मिक पद्धतीने होणाऱ्या या गणेशोत्सवात काल्याचे किर्तन  नाना महाराज कदम(नेकनूर) यांचे झाले.


              मागील पंधरा वर्षापासून गणेश उत्सवात अखंड हरिनाम सप्ताह स्वप्निल महाराज पवार यांच्या मार्गदर्शनाने पार पाडला जातो त्यामुळे त्यांचा अखिल विश्व वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव यादवराव पाचारणे पाटील व उपस्थित मान्यवरांकडून विठ्ठलाची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.


यावेळी  सरपंच शरदभाऊ पवार यांनी स्वप्नील महाराज पवारकाल्याचे कीर्तनकार  नाना महाराज कदम,साहेबराव पाचरणे पाटील यांचा तसेच  सर्व संत पूजन करणाऱ्या व काल्याची पंगत देणाऱ्या चंद्रकांत पवारअभयशेठ छाजेड,पोपट कोकाटे,इम्रानशेठ आतार या दात्यांचा सन्मान मंडळाचे अध्यक्ष शहाजीशेठ गोरेसंजय पवारजानू तनपुरेपंडित भद्रेभगवान पवारपंडित कोकाटेसुरेश तनपुरेअरुण दवनेबंडू पवारराजू कोकाटेचंद्रकांत पवनेमाऊली ठोंबरेकिरण मोरेराजाभाऊ पवार यानी सन्मान केला.


              गणेश उत्सव काळात लोकनेते आ.निलेश लंकेव काल्याच्या कीर्तनासाठी लोकनेते घनश्याम (आण्णा)शेलारमा. सभापती प्रवीण कोकाटेमा जी प सदस्य संदेश कार्लेप्रकाश पोटेनांदूरचे सरपंच विलास उर्फ पप्पू गवळी यांनी भेट दिल्याबद्दल यांचा सन्मान करण्यात आला.


         तसेच यावेळी  संगम मित्र मंडळाला  श्री गणेशाची मूर्ती देणाऱ्या भाऊसाहेब जटाडे यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आलाव गावात हरीओम मित्र मंडळ व संगम मित्र मंडळची विसर्जन मिरवणूक गावातील सर्व भजनी मंडळी तुलसी कलश घेऊन महिला भगिनीनी गणरायाची भक्ती गीते गाऊन व गावातून भव्य दिव्य मिरवणूक काढून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ही गणपती बाप्पाला साथ घालून विसर्जन केले