Dental Camp: नवरात्रीनिमित्त ‘द डेंटल स्पेस’च्यावतीने मोफत दंत तपासणी शिबीर
Dental Camp: अहमदनगर (प्रतिनिधी): भाग्योदय कॉम्प्लेक्स, अंबिकानगर बसस्टॉप, केडगांव येथील द डेंटल स्पेसच्यावतीने नवरात्रनिमित्त दि.15 ते 24 ऑक्टोबर 2023 पर्यंत मोफत दंत तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ.प्रांजल गायकर- बर्वे यांनी दिली.
या शिबीरात महिला व मुलांची दंत तपासणी करण्यात येणार आहे. यात दातांना किड लागणे, तोंडातून दुर्गंधी येणे, हिरड्यामधून रक्त, पू येणे, वेडेवाकडे दात, रुट कॅनाल ट्रिटमेंट, कवळी बसविणे, दात/दाढ काढणे.
दातांमध्ये सिमेंट भरणे, लहान मुलांच्या दातावरील समस्या व उपाय, इंप्लांट, क्राऊन व ब्रिज बसवणे या सारख्या सर्व दातांच्या समस्यांचे निराकरण या मोफत शिबीरात करण्यात येणार आहे.
तरी या शिबीराचा महिला व लहान मुला-मुलींनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.प्रांजल गायकर- बर्वे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मो. 9834223784 या नंबरवर संपर्क साधावा.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com