Satkar: जिल्हा पॉवरलिफ्टिंग अॅण्ड वेटलिफ्टींग असो.च्यावतीने अक्षय कर्डिले यांचा सत्कार
Satkar:अक्षय कर्डिले यांच्या माध्यमातून युवकांच्या प्रश्नांबरोबर खेळाडूंचे प्रश्न सुटण्यास नक्कीच मदत : सौरभ बल्लाळ
Satkar: अहमदनगर (प्रतिनिधी): भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी अक्षय कर्डिले यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा पॉवरलिफ्टिंग अँड वेटलिफ्टिंग असोसिएशन च्यावतीने सेक्रेटरी सौरभ बल्लाळ यांनी सत्कार केला. याप्रसंगी आयोजन सचिव निश्नात गिल्डा, सहसचिव लवण गालपेल्ली, प्रियेश यादव, सतिष भोसले, शुभम चव्हाण, विक्रांत कासार आदि उपस्थित होते.
याप्रसंगी सौरभ बल्लाळ म्हणाले, अक्षय कर्डिले यांनी युवकांचे मोठे संघटन उभे केले असून, युवकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने दिलेली जबाबदारी ते यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे. जिल्हा पॉवर लिफ्टींग अॅण्ड वेटलिफ्टिंग संघटनेच्या अध्यक्ष पदाच्या माध्यमातून जिल्ह्यातील खेळाडूंसाठी विविध स्पर्धा आयोजित करुन प्रोत्साहन देत आहेत. आता मिळालेल्या पदाच्या माध्यमातून युवकांच्या प्रश्नांबरोबर खेळाडूंचे प्रश्न सुटण्यास नक्कीच मदत होईल, असे सांगितले.
सत्कारास उत्तर देतांना अक्षय कर्डिले म्हणाले, नगरमधील युवक शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. या युवकांना योग्य व्यासपीठ मिळवून देऊन दिशा देण्याचे काम सर्वांना एकत्रितपणे करावयाचे आहे.
त्याचबरोबर शासनाच्या युवकांसाठीच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळवून देऊन त्यांची योग्य ती प्रगती साधण्याचा आपला प्रयत्न राहिल. जिल्हा पॉवरलिफ्टिंग अँड वेटलिफ्टिंग असोसिएशनच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध स्पर्धा आयोजित करु, या सत्काराने प्रेरणा मिळणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी निश्नात गिल्डा यांनी सूत्रसंचालन करुन असोसिएशनच्या उपक्रमांची माहिती दिली. शेवटी लवण गालपेल्ली यांनी आभार मानले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com