Ahmednagar Lawyer: अॅड.सतीशचंद्र सुद्रिक यांचे बुधवारी श्रीगोंद्यात व्याख्यान
Ahmednagar Lawyer: अहमदनगर (प्रतिनिधी) - अहमदनगर येथील प्रसिद्ध फौजदारी वकिल सतीशचंद्र सुद्रिक यांचे बुधवार दि.8/11/2023 रोजी श्रीगोंदा येथील जिल्हा न्यायालयातील वकिल संघटनेच्यावतीने ‘सत्र न्यायालयातील कामकाजची तयारी’ या विषयावर दुपारी 2 वा. व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अॅड.सुद्रिक यांचे राज्यभरातील हे 13 वे व्याख्यान आहे.
अॅड.सुद्रिक यांनी जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात कामकाज केलेले आहे. राज्यात गाजलेल्या 1990 मधील पानसवाडी खून खटला, सोलापूर येथील 1991 मध्ये झालेल्या तिहेरी हत्याकांडत त्यांनी मूळ फिर्यादीतर्फे काम पाहिले. त्यामध्ये आरोपीस फाशीची शिक्षा होऊन, ती सर्वोच्च न्यायालयात कायम झाली. हिंदी चित्रपटातील आघाडीचा अभिनेता शाहरुख खान यांच्यावतीने उच्च न्यायालयापर्यंत त्यांचे वकिल म्हणून कामकाज पाहिले.
प्रभावीपणे बाजू मांडून शाहरुख खानतर्फे खटला यशस्वी केला. राज्य शासनाने उच्च न्यायालयात त्यांचे विशेष सरकारी वकिल म्हणून अनेक खटल्यांमध्ये नियुक्ती केली होती.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com