Ahmednagar BJP: ताठे मळा स्वस्त दरातील डाळ केंद्राचा शुभारंभ
Ahmednagar BJP: अहमदनगर (प्रतिनिधी) - पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार हे खर्या अर्थाने सर्वसामान्यांचे सरकार आहे. सर्वसामान्यांचे प्रश्नांना प्राधान्य देऊन ते सोडविण्यासाठी विविध योजना सुरु केलेल्या आहेत. या योजनांचा लाभ अनेकांना मिळत असल्याने मोठा दिलासा मिळत आहेत. सध्या दिवाळी सणानिमित्त शासनाच्यावतीने नागरिकांसाठी अल्प दरात डाळ उपलब्ध करुन दिली आहे.
त्याचबरोबर रेशन दुकानांमधून आनंदाचा शिधाही उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याने नागरिकांची दिवाळी गोड होणार आहे. ताठे मळा परिसरातच नागरिकांसाठी डाळ वाटप केंद्र सुरु केल्याने मोठी सोय झाली आहे. शासनाच्या योजनांना लाभ नागरिकांना मिळवून देण्यात येत असल्याचे प्रतिपादन नगरसेविका वंदना ताठे यांनी केले.
प्रभाग क्रमांक सहा ताठे मळा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरिकांना स्वस्त दरामध्ये हरबरा डाळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा शुभारंभ नगरसेविका वंदना ताठे व माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुरेंद्र गांधी, विलास ताठे, सुनील सूर्यवंशी, महावीर कांकरिया, बडवे काका, देशमुख काका, अरुण शिंदे, राहुल ताठे, प्रवीण ताठे, विनायक खेडकर, गौरी ताठे, शोभा ताठे, आढाव वर्षा, पल्लवी आढाव, बालवण कुलकर्णी, नवनाथ कोरेकर, शशिकांत कावळे, शंकर आव्हाड, गणेश ताठे, भाऊसाहेब भगत, मनोज ताठे व नागरिक उपस्थित होते.
याप्रसंगी बाबासाहेब वाकळे म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्यावतीने नागरिकांना दिवाळी सणानिमित्त डाळ केंद्र सुरु केले आहे, यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शासनाच्यावतीने जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात येत आहेत, त्याचा लाभ संबंधितांपर्यंत मिळवून देण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशिल आहोत, असे सांगितले.
यावेळी सुवेंद्र गांधी म्हणाले, या केंद्रावर हरभरा डाळ 60 रु.किलो मिळत असून, एका आधार कार्डवर 5 किलो डाळीचे वितरण केले जाते, हे केंद्र आणखी काही दिवस सुरु राहणार आहे, त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी परिसरातील नागरिकांनी डाळ खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. शेवटी राहुल ताठे यांनी आभार मानले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com