Avtar Meherbaba: मेहेरबाबाच्या अमरतिथीला मंगळवार दि.३० जानेवारीला प्रारंभ
मेहेरबाबा यांचे जगभर अनुयायी आहेत आणि संपूर्ण जगभरातून विविध देशातील नागरिक अहमदनगर शहरातील तीन केंद्रांवर जेथे -जेथे मेहेरबाबा यांनी वास्तव्य केले त्याठिकाणी येतात आणि मनशांती प्राप्त करतात.
अरणगाव येथील मेहेराबाद प्रमाणेच अहमदनगर शहरातील मध्यवस्तीत अहमदनगर मनपाच्या सरोश बागे जवळ असलेल्या झेंडीगेट येथील "अवतार मेहेरबाबा केंद्रावर" मेहेर बाबा यांनी वास्तव्य केले आणि याठिकाणाहून त्यांना भेटीला येणाऱ्या अनेक भाविकांना समता,एकता आणि शांतीचे संदेश दिले.
अमेरिका,लंडन,पॅरिस,इराण आणि जर्मनी, रशिया तसेच युरोप देश आणि सर्व जगभरातून हजारोंच्या संख्येने मेहेर भक्त अहमदनगर शहरातील सरोश बाग शेजारील सरोश पेट्रोल पंप जवळ मेहेरबाबा यांनी वास्तव्य केलेल्या केंद्रावर उतरून येथे काही दिवस ज्याप्रमाणे "मेहेरबाबा" यांनी शहरातील मध्यवस्तीत असलेल्या या केंद्रावर वास्तव्य केले त्याप्रमाणे जगभरातील मेहेरभक्त हि वास्तव्य करतात आणि त्यांनतर मेहेरबाबा यांच्या समाधी असलेल्या मेहेराबाद येथे जाऊन राहतात.
मेहेराबाद(अरणगाव) येथे अवतार मेहेरबाबा यांच्या समाधीस्थळी ५५ वी अमरतिथी (पुण्यतिथी)सोहळा मंगळवार दि.३० जाने.ला प्रारंभ होत असून तो १ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे यासाठी देशातून सुमारे लाखाच्या वर बाबाप्रेमी, भाविक येतील अशी माहिती विश्वस्त मेहेरनाथ कलचूरी यांनी दिली.
जगात मेहेरबाबांचे असंख्य भक्त असून असंख्य केंद्रेही आहेत.सर्व जाती धर्मातील लोकांना मानवतेचा व सत्याचा संदेश देत त्यांनी जगभर प्रवास केला जगात मी कोठेही देह सोडला तरी मेहेरावाद येथे बांधलेल्या समाधीत मला समाधीस्त करावे असे त्यांनी सांगून ठेवले होते ३१ जाने १९६९ रोजी त्यांचे महानिर्वाण झाले.म्हणून या ठिकाणी अमरतिथी सोहळयासाठी लाखो भाविक येत असतात.
.३० जाने.रोजी सकाळी ११ वा बाबांची प्रार्थना,आरतीने कार्यक्रमास प्रारंभ होईल.नंतर फिल्म शो,तसेच विविध केंद्रावरुन आलेले लोक भजने म्हणतील,दि. ३१ रोजी सकाळी ६ वा आरती प्रार्थना होईल सकाळी ११ वाजता व्याख्यान होईल,११.३० वाजता मेहेरधून म्हटली जाईल.
बाबानी देहत्याग केला त्यावेळी दुपारी १२ वाजता १५ मिनिटे मौन पाळले जाईल व नंतर सर्व भाषांमधून आरती प्रार्थना होईल.दु.२ ते रात्री १० पर्यंत लोक भजने बाबावरील सांस्कृतीक व नृत्याचा कार्यक्रम,नाटक,गजल, इ. कार्यक्रम सादर करतील.
दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळी १२ पर्यंत भजने व दु.२ वाजता आरती, प्रार्थना होऊन कार्यक्रमाची सांगता होईल. असे चेअरमन फॉमरोज मिस्री यांनी सांगितले

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com