Dr Paulbudhe College: डॉ.ना.ज.पाउलबुधे फार्मसी कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन
अहमदनगर (प्रतिनिधी) - स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याकडे पाहिले जाते. त्याकाळात स्त्रीयांना शिक्षण मिळणे दुरास्पत होते. अशा काळात सावित्रीबाईंनी स्त्रीयांना शिक्षणाची दारे खुले केली. त्यांच्या स्त्री कार्याची दखल घेत शासनाने पुणे विद्यापीठाचे ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे नामांतर केले.
बदलत्या काळानुरुप स्त्रीयांनी शिक्षण घेऊन आज विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तुत्वाने भरारी घेतली आहे. स्त्रीयांही कोणत्या क्षेत्रात कमी नाही हे आज आपणास सर्वच क्षेत्रातून दिसून येत आहे. महिलांनीही आपल्या हक्क मिळविण्यासाठी संघर्ष केला पाहिजे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव डॉ.गोकुळदास लोखंडे यांनी केले.
वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे फार्मसी कॉलेजमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ.गोकूळदास लोखंडे, संस्थेचे संचालक साई पाउलबुधे, रघुनाथ कारमपुरी, प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, प्राचार्य डॉ.निलेश जाधव, प्राचार्या अनुराधा चव्हाण, प्राचार्या सविता सानप, शिक्षकवृंद उपस्थित होते.
याप्रसंगी प्राचार्या रेखाराणी खुराणा म्हणाल्या, सावित्रीमाई यांनी अपार कष्ट, समाजाची अवहेलना सहन करून मुलींसाठी शिक्षण खुले केले. आज महिला उन्नती झाली ती पूर्णत: त्यांच्याच मुळेच. महिलांनी या उपकाराची जाणीव ठेवून त्यांच्या विचारावर काम करणे गरजेचे आहे, असे सांगितले.
यावेळी साई पाउलबुधे यांनी संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.निलेश जाधव यांनी केले तर अनुराधा चव्हाण यांनी आभार मानले.
-compressed%20(1).jpg)
टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com