Dr Paulbudhe School: आर्थिक, तांत्रिक, वैज्ञानिक प्रगतीमुळे भारताचे महासत्ता होण्याचे स्वप्न लवकरच पुर्ण होणार - डॉ.अविनाश वारे
डॉ.पाउलबुधे शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिन साजरा
Dr Paulbudhe School: अहमदनगर (प्रतिनिधी) - भारताच्या अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन साजरा करताना आपण 75 वर्षात काय साध्य केले आणि पुढची वाटचाल कशी असावी याचे चिंतन करावे. आपल्या देशाने 74 वर्षात आर्थिक, तांत्रिक, वैज्ञानिक क्षेत्रात भरपुर प्रगती केली, त्यामुळे नागरिक महासत्ता होण्याच्या दिशेने सुरु असलेली वाटचाल, यामुळे भारताचे महासत्ता होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल, असे प्रतिपादन डॉ.अविनाश वारे यांनी केले.
वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे शैक्षणिक संकुलात भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. डॉ.अविनाश वारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. डॉ. धनंजय वारे, डॉ. ममता पटवर्धन, समीर पटवर्धन संस्थेने सहसचिव आर. ए. देशमुख, विश्वस्त साई पाऊलबुधे, श्रद्धा पाऊलबुधे, डॉ. रघुनाथ कारमपुरी, प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, अनुराधा चव्हाण, सविता सानप, सुचित्रा डावरे प्राचार्य डॉ.निलेश जाधव, संदिप कांबळे, प्रा.भरत बिडवे, मुख्याध्यापिका अनिता सिद्दम, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
पुढे बोलतांना डॉ. वारे म्हणाले, 26 जानेवारी 1949 रोजी भारतीय प्रजासत्तक दिन उदयास आला. या देशाचा कारभार राज्यघटने नुसार केला जातो. जातीभेद, दहशतवाद, विषमता, दारिद्रय, भेदाभेद, असहिष्णुता, नक्षलवाद विसरुन आपण कस आहोत, असे वागलो तर या देशाचे भान आपल्याला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी हजारो सैनिक, क्रांतीकारांनी आपले बलिदान दिले, त्याचे विस्मरण होता काम नये.
प्रास्तविकात संस्थेचे सहसचिव श्री.देशमुख म्हणाले सेवा शिक्षण प्रसारक संस्थेच्या उभारणीसाठी स्व.डॉ.ना.ज.पाउलबु धे यांचे मोठे योगदान होते. पण ते स्वत: त्याचे श्रेय न घेता त्यांच्या सहकार्यांशी चर्चा करून देत. कोणकोण काय योगदान देणार, कोणत्या गोष्टी कशा मिळविणार त्यासाठी त्याग, समर्पण, वेळ या सर्व गोष्टींची गरज ओळखून संस्थेची उभारणी केली. सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांनी या संस्थेचे नाव उंचवण्यासाठी योगदान दिले. चांगले विद्यार्थी या शैक्षणिक संकुला मधून घडविले याचा आम्हाला आनंद आहे, असे सांगितले.
सूत्रसंचालन प्रा.दीपक परदेशी यांनी केले तर आभार राजेंद्र मोरे यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले. याचे नियोजन प्रा. आशा गावडे यांनी केले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com