Meherbaba: मेहेरबाबाच्या अमरतिथीस प्रारंभ जय बाबाच्या जयघोषाने दुमदुमली टेकडी
अहमदनगर (प्रतिनिधी) -येथील दौंड रोडवरील मेहराबाद(अरणगाव)मधील मेहेरबाबाच्या टेकडीवरील समाधी स्थळी ५५ वी अमरतिथी(पुण्यतिथी) सोहळा आजपासून प्रारंभ झाला आहे त्या निमीत मोठ्या संख्नेने कालपासून भाविक येण्यास सुरवात झाली असून आज पाहटे पासूनचं समाधीचे दर्शन घेण्यास रांगा लागल्या आहेत सुमारे लाखाच्यावर मेहेरप्रेमी भारतातून आले आहेत. दि १ फेब्रुवारी २३ पर्यंत हा सोहळा होणार आहे.
दर्शनासाठी टोकन पद्धत वापरली जाते त्यामुळे गडबड,गोंधळ होण्याचा संभव नसतो एका वेळेस पाचशे लोकांना टोकन दिले जाते त्याचा नंबर प्रमाणे दर्शनास सोडले जाते त्याची ही वेळ आधी सांगितली जाते.त्याप्रमाणे भाविक रांगेत उभे राहतात.त्याच्या साठी दर्शन रांग व त्यावरील मंडप ,पिण्याच्या पाण्याची व बसण्याची व्यवस्था ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे.
नगर शहरापासून ६ की मी असेलेल्या मेहराबाद येथील टेकडी मेहेरप्रेमी जणांनी फुलून गेली आहे.अवतार मेहेरबाबा कि जय चा जयघोष ते करत आहे.दुपारी १२ वा बाबाच्या प्रतिमेचे पूजन करून विविध भाषेतून आरती प्रार्थना म्हणून अमरतिथीच्या सांस्कृतिक कार्यक्
कार्यक्रमासाठी चाळीस हजार भाविक बसतील असा भव्य मंडप आहे. मेहेरप्रेमी भजने,गजल,नृत्ये,कव्वा
एस टी ने येणाऱ्या भाविकांसाठी तीनही बसस्टेशन वरून मेहेराबादला बसेस सोडण्यात येत आहे.पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमणावर आहे.अग्निशामक दल हि आहे,अनेक उपहारगृहे,प्रसादाची दुकाने,बाबाची फोटो,किचेन आदि विविध वस्तूची दुकाने मोठ्या प्रमाणात आहे. तर हजारो युवक,युवती स्वयसेवकाचे काम करत आहेत .
मेहेरबाबांचे असंख्य भक्त जगात असून असंख्य केंद्रेही आहेत.सर्व जाती धर्मातील लोकांना मानवतेचा व सत्याचा संदेश देत त्यांनी जगभर प्रवास केला जगात मी कोठेही देह सोडला तरी मेहेरावाद येथे बांधलेल्या समाधीत मला समाधीस्त करावे असे त्यांनी सांगून ठेवले होते ३१ जाने १९६९ रोजी त्यांचे महानिर्वाण झाले.म्हणून या ठिकाणी अमरतिथी सोहळयासाठी लाखो भाविक येत असतात.
मेहेरप्रेमी भक्तांसाठी मेहेरबाबा यांची समाधी मेहेराबाद येथे आहे त्याचप्रमाणे मेहेर बाबा यांनी अहमदनगर शहरातील मध्यवस्तीत असणारे अहमदनगर मनपाच्या "ऐतिहासिक सरोष बागे" पाठीमागे आणि सरोश पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या मेहेर बाबा केंद्रावर मेहेरबाबा यांना विशेष प्रेम होता आणि त्यामुळे त्यांनी शहरातील झेंडीगेट भागातील असणाऱ्या या केंद्रावर नेहमी आणि नियमित आपले जीवन व्यतीत केले आणि या केंद्रावरून देश विदेशातील आपल्या भक्तांना प्रेम,शांती आणि एकात्मतेचे धडे शिकवले आणि अहमदनगर शहरातील मध्यवस्तीतील केंद्र असूनही येथे एक विशेष शांतीचा आभास होतो त्यामुळे मेहेरभक्तानी याठिकाणी मेहर बाबांना कोणता अनुभव मिळाला ते याठिकाणी भेट देऊन आणि शक्य झाल्यास मुक्काम करून त्या विशिष्ट शांतीचा अनुभव घ्यावा समाधीचे ठिकाण मेहेरबाबा यांनी मेहराबाद निवडले परंतु झेंडीगेट येथील केंद्रावर नेहमी विशेष प्रेम ठेवले आणि याठिकाणी नेहमी राहिले. याबाबत अनेक पुरावे आणि त्यांचे या केंद्रावरील असणारे विशेष प्रेम दर्शविणारे छायाचित्रे आजही अहमदनगरमध्ये आणि जगभर असणाऱ्या त्यांच्या भक्तांकडे उपलब्ध आहेत
-compressed.jpg)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com