Satkar: यशासाठी जिद्द व मेहनत महत्वाची -जालिंदर बोरुडे
अहमदनगर (प्रतिनिधी) : - जिद्द, चिकाटी असल्याने कोणत्याही क्षेत्रात आपणास यश मिळविता येते. आजचा विद्यार्थी हा सजग आहे, बदलत्या अभ्यासक्रमानुसार त्यात स्वत:ला झोकून देत अभ्यास करुन यश मिळवत आहे. भक्ती संभार हीने सी.ए. परिक्षेत मिळविलेले यश हे सर्वांसाठी अभिमानास्पद असेच आहे. या यशामागे तिची जिद्द व मेहनत महत्वाची आहे.
आज मुली कोणत्याच क्षेत्रात कमी नाहीत, त्यांना प्रोत्साहन दिल्यास ते नक्कीच यशस्वी होत असतात हे कु.भक्तीने दाखवून दिले आहे. मुलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात करिअरची संधी दिल्यास ते नक्कीच यशस्वी होतात, हे भक्तीने दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन फिनिक्स फौंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी केले.
फिनिक्स फौंडेशनच्यावतीने सी.ए. परिक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल कु.भक्ती संभार हीचा सत्कार करताना अध्यक्ष जालिंदर बोरुडे. समवेत मनपाचे माजी नगरसचिव मिलिंद वैद्य, विलास संभार, हनुमंत म्याना आदिंसह कुटूंबीय उपस्थित होते.
यावेळी मिलिंद वैद्य म्हणाले, आज आर्थिक, बँकींग क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी आहेत. या संधीचा फायदा घेण्यासाठी आपण त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. कु.भक्ती हीने मिळविले यश इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणारे आहे. यापुढील काळातही तिच्या यशाची घोडदौड सुरु राहील. अशा शुभकामना दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com