Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयातील बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन विभागात मॅनेजमेंट विक उत्साहात साजरा
अहमदनगर (प्रतिनिधी)- बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन विभागात नुकतीच माइंड फुल रिट्रीट अँड डोनेशन ड्राईव्ह 2024 मॅनेजमेंट वीक साजरा करण्यात आला.
मॅनेजमेंट विकचे उद्घाटन अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे बार्नबस यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व सर्व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
मॅनेजमेंट वीक च्या पहिल्या दिवशी प्रा. गिरीश कुकरेजा यांचे सेल्फ ग्रुमिंग या विषयावर गेस्ट लेक्चर घेण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना व्यक्तिगत व्यक्तिमत्व या विषयावर मार्गदर्शन त्यांनी केले. बिझनेस टाय कोण या विषयावर विद्यार्थ्यांनी प्रेझेंटेशन दिले.
यामुळे विद्यार्थ्यांनी वेगवेगळे बिजनेस व बिझनेसमन्स ची माहिती दिली व ग्रुप डिस्कशन आणि डिबेट घेण्यात आले. तसेच हेल्थ डे मध्ये सोनिया सराफ यांनी झुंबा, योगा, प्राणायाम प्रात्यक्षिक करून घेतले.
यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य व व्यायाम करण्यासाठी जागृकता निर्माण होते. प्लांटेशन आणि डोनेशन डे या दिवशी विद्यार्थ्यांकडून विभागामध्ये विविध प्रकारचे फुल झाडे लावण्यात आले. कल्चर डे विथ टिफिन डे साजरा करण्यात आला. या दिवशी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या राज्यातील प्रतिनिधित्व केले व त्या राज्यांचे व्यंजन विद्यार्थ्यांनी आणले होते.
या सर्व स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो तसेच स्टेज कॉन्फिडन्स टीम वर्क जनरल नॉलेज ह्या गुणांमध्ये वाढ होते. तसेच विद्यार्थ्यांमध्ये समाज व पर्यावरण विषयी जागृती व संवेदनशीलता निर्माण होते.या कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख डॉक्टर सुषिता अय्यर व सर्व प्राध्यापक रुंद यांनी परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com