Ahmednagar Film Festival: अहमदनगरमध्ये 5 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तारखा जाहीर: 29 ते 31 मार्च 2024 45 देशांचा सहभाग

 
Ahmednagar Film Festival: अहमदनगरमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ; “45 देशांचा सहभाग”

 

 अहमदनगर : चित्रपटाच्या रंगीबेरंगी दुनियेला जिवंत करण्याचा महोत्सव पुन्हा अहमदनगरच्या किनाऱ्यावर येतोय! यावेळी 29 ते 31 मार्च 2024 या कालावधीत वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित केला जाणार आहे.


चित्रपट रसिकांसाठी हा महोत्सव समाधानकारक आणि रोमांचक अनुभवाची संधी देईल. 45 राष्ट्रांचे सिनेमे एकत्र आणण्याचे हे माध्यम तर ठरेलचपण त्यातून समाजाला इतर देशांतील सांस्कृतिक वैविध्य आणि नवनवीनता अनुभवायला मिळणार आहे.

Ahmednagar Film Festival: अहमदनगरमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ; “45 देशांचा सहभाग”


 

या महोत्सवाच्या तारखेची घोषणा नुकत्याच अह्मानगर फिल्म फौंडेशन आयोजित चित्ररंग या कार्यक्रमा मध्ये करण्यात आली या वेळी चित्रपट दिग्दर्शक श्री. संदीप सावंत आणि आमचे मार्गदर्शक आणि व्यावसायिक श्री. गौतम मुनोत उपस्थित होते. यावेळी श्री.संदीप सावंत म्हणाले कीचित्रपट हे भाषेचे माध्यम आहेचित्रपटामुळे मुलांमध्ये सर्जनशीलता विकसित होते. चित्रपट हे सांस्कृतिक आदान प्रदान तेच साधन आहे . चित्रपटांच्या माध्यमातून समाजाला संदेश देण्याचे महत्त्वही त्यांनी मांडले.


यावेळी गौतम मुनोत म्हणाले कीयावेळचा महोत्सव आणखी जागतिक असेल आणि आम्ही ४५ देशांचे एकाच छताखाली स्वागत करत आहोत , अहमदनगरचे नाव जगभरा मध्ये पोहोचवण्यासाठी हा मोहत्सव खुप महत्वाचे मध्यम ठरत आहे. प्रत्येक सिनेप्रेमी ने हा महोत्सव पाहण्यासाठी येतो आणि तो या मोह्त्सावाला अनोखा मानतो, हा महोत्सव केवळ चित्रपट जगतासाठीच महत्त्वाचा नसून अहमदनगरच्या पर्यटनाला नव्या उंचीवर नेण्यास मदत करेल. या महोत्सवाच्या तारखा लक्षात घ्या आणि सिनेमाच्या जादूमध्ये हरवून जा! असे ते म्हणाले.


मोहत्सवाची माहिती देताना मोहत्चाव प्रमुख यांनी सांगितले की जगातील 45 देश या मोहोत्सवा मध्ये 460 पेक्षा ज्यास्त चित्रपट,लघुपट,माहितीपट घेऊन सहभागी होत आहेत . या मध्ये प्रामुख्याने अमेरिका, फ्रांस ,ऑस्ट्रेलिया ,रशिया, चीन , जपान , इंग्लंड , तुर्की , स्पेन , पनामा , मेक्सिको , इटली , ग्रीस , तैवान ,नामेबिया, नेपाल इंडोनेशिया , जर्मनी , डेन्मार्क , न्यूझीलंड या देशांमधून चित्रपट , लघुपट , माहितीपट यांनी सहभाग नोंदवला आहे . यातील निवडक 9 चित्रपट, 30 लघुपट , 5 माहितीपट , यांची निवड केली जाणार आहे .याचे प्रदर्शन 29 ते 31 मार्च रोजी होईल . या सोबतच करमणुक क्षेत्रामधील तज्ञ मंडळींचे मास्टर क्लास सुध्दा या वेळी होणार आहेत,


सोबतच दर महिन्याला एक चित्रपट व त्या वरील गप्पा असा चित्रपट रसस्वाद वर्गाचे देखील आयोजन होत असते . त्याचाच भाग म्हणून संदीप सावंत दिग्दर्शित ह्या गोष्टीला नावच नाही  या चित्रपटाचे प्रदर्शन आणि सावंत यांच्यासोबत गप्पा असा कार्यक्रम संपन्न झाला . या वेळी दिग्दर्शक संदीप सावंत यांच्या सोबत प्रेक्षकांनी मनमोकळ्या गप्पा सुध्दा मारल्या . प्रेक्षक आणि दिग्दर्शक यांच्यातील खुला संवादाने प्रेक्षक व दिग्दर्शक दोघेही भारावून गेले होते . प्रेक्षक परिपक्व होत असल्याची भावना सावंत यांनी बोलून दाखवली.


या वेळी सारंग देशपांडे ,सिद्धांत टेमकर , प्रथमेश बर्डे महेश गडदे , कार्तिक पोपाटानी यांनी कार्यक्रम यशस्वीते साठी परिश्रम घेतले. सुत्र संचालन प्रसाद बेडेकर यांनी केले.