सद्भावना मंचच्या माध्यमातून बंधुत्व, शांती सुरक्षा टिकविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करु - अॅड.संभाजी बोरुडे
अहमदनगर- देशात काही संधीसाधू प्रवृत्तीमुळे आपल्या गलिच्छा राजकीय, आर्थिक जडणघडणीला उध्वस्त करण्याचा मार्गावर आहे. यामुळे समाजात जातीय शक्तीमध्ये भेद निर्माण होतो. अपप्रवृत्ती देशाला कायमस्वरुपी सांप्रदायिक तणावाच्या खाली ठेवू इच्छिणारांना आपण सद्भावना मंचच्या माध्यमातून बंधुत्व, शांती, सुरक्षा टिकविण्यासाठी एकत्र येऊन प्रत्येकाची जबाबदारी समजून काम करावे, असे प्रतिपादन अॅड.संभाजी बोर्हुडे यांनी केले.
अहमदनगर येथे जिल्ह्यातील विविध पदांवर काम करीत असलेले पोलिस, वकिल, माजी सैनिक, डॉक्टर्स, इंजिनिअर, पत्रकार असे सामाजिक क्षेत्रात काम करुन समाजाच्या हितासाठी स्वत:हून पुढे येत सद्भवना मंच स्थापन करुन सर्व धर्म समभाव संदेश देत कार्यरत असलेल्या जागरुक नागरिक म्हणून भुमिका पार पाडणारे सेवकांची बैठक नगरमध्ये पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना अॅड.बोर्हुडे बोलत होेते.
अहमदनगर येथे सद्भावना मंचची स्थापना करण्यात आली. बोरुडे यांची जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
सध्या समजातील सामाजिक व धार्मिक एकात्मिकाता हरवत चालली असून असे होणे धोकादायक आहे. त्यामुळे समाजातील समविचारी लोकांनी एकत्रित येऊन सद्भावना मंचची स्थापना करण्यात आली. या बैठकीला माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. रफिक सय्यद, मुबीन खान, डॉ. महेबुब सय्यद, माजी नगरसेवक संजय झिंजे आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्ह्यात कोठेही अनुचित घटना घडू नये यासाठी हा मंच कार्य करेल व त्यासाठी आवश्यक असलेली जागृती सद्भावना मंच करेल अशी भुमिका या मध्ये काम करणाऱ्या सदस्यांनी मांडली . यावेळी सद्भावना मंचचे जिल्हाध्यक्ष म्हणून सामाजिक कार्यकर्ते ॲड. संभाजी बोरुडे यांची निवड करण्यात आली. तर जिल्हा सचिव म्हणून मुबिन खान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
तसेच जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली. रफिक सय्यद यांनी सद्भावना ही संकल्पना अनेक दाखले देत विषद केली. यावेळी माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे व ॲड. संभाजी बोरुडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुबिन खान यांनी केले. तर आभार फिरोज शेख यांनी मानले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com