Bolhegao: सावेडी गावठाण ते बोल्हेगाव रस्ते  विकास कामाचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ 

Bolhegao: सावेडी गावठाण ते बोल्हेगाव रस्ते  विकास कामाचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ



अहमदनगर (प्रतिनिधी) : सावेडी गावठाण ते बोल्हेगाव ते निंबळक बायपास पर्यंतच्या सुमारे ८ कोटी रुपयांच्या रस्ता डांबरीकरण विकास कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. कुमारसिंह वाकळे यांच्या सततच्या पाठपुरावा व आ जगताप यांच्या प्रयत्नांना यश येत हे विकास काम सुरू झाले.

केवळ घोषणा नव्हे तर प्रत्यक्ष कृती या तत्त्वावर चालत निवडणुक काळात विकास कामांचे दिलेले वचन पूर्णत्वास जात आहे.

विकास कामांतून भौगोलिक विकासाबरोबरच आर्थिक विकास साधला जातो. दळणवळणाची लिंक जोडली गेली की नागरी वसाहती वाढत जातात. हा विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवूनच नगर शहरासह उपनगरातील रस्ते दर्जेदार पद्धतीने बनवण्याचे काम सुरू आहे. 

Bolhegao: सावेडी गावठाण ते बोल्हेगाव रस्ते  विकास कामाचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ


आ जगताप म्हणाले कि , बोल्हेगाव हे आता ग्रामीण भाग राहिला नसून एक मोठे उपनगर झाले आहे. शहरातील नागरिकांना निवडणुकीच्या काळात विकास कामांचे दिलेले वचन पूर्णत्वास जात आहे याचा मला आनंद आहे. माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांनी बोल्हेगाव नागापूरच्या विकास कामांसाठी सतत पाठपुरावा केला असल्यामुळे आज एकेकाळच्या खेडे गावचे रूपांतर आज शहरात झाले आहे. गेल्या १० वर्षात मूलभूत प्रश्नांपासून विकासाची कामे मार्गी लावली आहेत. 


आपली पिढी सुसंस्कृत व्हावी व अध्यात्मिकतेची गोडी निर्माण व्हावी यासाठी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याकरीता मंदिर परिसरात सभा मंडपाचे काम उभे केले आहे.  लवकरच गांधीनगर व गणेश चौक येथील प्रलंबित रस्त्याची कामे मार्गी लागणार आहेत. शासनाच्या माध्यमातून विकास कामांसाठी आणलेल्या निधीचा वापर कुमारसिंह वाकळे हे योग्य पद्धतीने करत असल्याने बोल्हेगाव परिसरात विकासाची कामे उभी राहिली आहेत. 

अनेक नागरिकांची बोल्हेगाव भागात रहिवासासाठी तसेच उद्योगधंद्यांसाठीची पसंती वाढत असल्याने येथील रस्त्यांची कामे प्रामुख्याने आपण हाती घेतली आहेत. काही दिवसातच शहर व बोल्हेगाव भागाला जोडणाऱ्या सीना नदीवरील पूलाचे देखील काम सुरू होणार आहे.  काही वर्षांपूर्वी या भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय होती. परंतु माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या  माध्यमातून येथील भागांचा विकास साधला जात आहे.  

Bolhegao: सावेडी गावठाण ते बोल्हेगाव रस्ते  विकास कामाचा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ


यावेळी माजी सभापती कुमारसिंह वाकळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष घिगे, ह. भ. प. तुकाराम महाराज कातोरे, राधाकिसन महाराज कातोरे, भिवसेन महाराज कोलते, अमोल लगड, सचिन जगताप, ज्ञानदेव कापडे, मारुती कापडे, विजय वाकळे, मछिंद्र वाकळे, दिलीप वाकळे, नाथा वाटमोडे, बाळू अण्णा वाकळे, रंगनाथ वाटमोडे, भीमा वाकळे, बबन कराळे, रुपचंद कळमकर, गुलाब शेख, रमेश वाकळे, किसनराव भिंगारदिवे, राम कदम, साधनाताई बोरुडे, रजनी आमोदकर आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.