Satkar: लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधिक्षक प्रविण लोखंडे यांचा श्री संताजी पतसंस्थेच्यावतीने सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी) - येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे नूतन पोलिस अधिक्षक प्रविण लोखंडे यांचे श्री संताजी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने स्वागत करुन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पतसंस्थेचे मानद सचिव हरिभाऊ डोळसे, अॅड.अर्जुनराव काळे, श्रीराम हजारे, पतसंस्थेचे अधिकारी जब्बारभाई शेख, प्रमोद वाळके, पो.कॉ. सचिन सुद्रीक आदि उपस्थित होते.
याप्रसंगी प्रविण लोखंडे म्हणाले, लाच देणे.. लाच घेणे गुन्हा आहे. कोणत्याही शासकीय कामांसाठी नागरिकांनी लाच देऊ नये. कोणता लोकसेवक लाच मागत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.
नागरिकांचे कामे कोणत्याही अमिषाशिवाय होण्यासाठी कार्यालय तत्पर आहे. नागरिकांनीही निर्भयपणे आपली तक्रार असल्यास आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. संताजी पतसंस्थेने केलेल्या सत्कारामुळे प्रोत्साहन मिळणार असल्याचे सांगितले.
यावेळी हरिभाऊ डोळसे म्हणाले, पोलिस उपाधिक्षक प्रविण लोखंडे यांनी आपल्या कार्य कर्तुत्वाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लाच देणे-घेण्यास प्रतिबंध करण्यासाठी ते ठोस भुमिका घेतील व नागरिकांचे कामे विना देण्या-घेण्याने होतील, असा विश्वास व्यक्त केला.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com