Sun Pharma School: सनफार्मा विद्यालयातील विद्यार्थ्यांचा कला-क्रीडा गुणगौरव सोहळा संपन्न

Sun Pharma School: विद्यार्थ्यांच्या कलाकृती त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविणार्‍या  - दादाभाऊ कळमकर




     Sun Pharma School: अहमदनगर (प्रतिनिधी) - प्रत्येकात काही ना काही कला लपलेली असते, या कलेला प्रोत्साहन देणे गरजेचे असते. सनफार्मा विद्यालयात आयोजित केलेल्या विविध कला स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील कला-गुण सर्वांसमोर आले. आपल्या कल्पनांना वाव देत निर्माण झालेल्या कलाकृती विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढविणार्‍या आहेत. 


शाळेतून मिळालेले संस्कार आणि कलाकृतीसाठी मिळालेले व्यासपीठ मुलांच्या करिअरसाठी प्रोत्साहन देणारे आहे. भविष्यात हे विद्यार्थी आपल्या कर्तुत्वाने विद्यालयाच्या लौकिकात भार घालतील, असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांनी व्यक्त केला.


     नागापुर येथील सनफार्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कला विषर्यांतंर्गत चित्र, शिल्प, गायन, वादन, नाट्य, नृत्य आंतर शालेय स्पर्धा घेण्यात आल्या. यामधील यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष दादाभाऊ कळमकर यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. याप्रसंगी सचिव बबनराव कातोरे, शाला समिती अध्यक्ष सुदामराव भोर, रावसाहेब सप्रे, खजिनदार दिगंबर सप्रे, खडू शिल्पकार अशोक डोळसे,  प्रा.अंकुश आवारे, प्राचार्य रावसाहेब सातपुते, मुख्याध्यापक शिवाजीराव लंके, काकासाहेब वाळूंजकर आदि उपस्थित होते.


     या स्पर्धेसाठी इ.5 वी ते 7 वी,  इ. 8 वी ते 10 वी असे गट करण्यात आले होते. यामधून पहिल्या तीन विद्यार्थ्यांना गौरव ट्रॉफी, गोल्ड मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. परिक्षक म्हणून अरुण ससे, संगीत गाडेकर, शेख मॅडम यांनी काम पाहिले.


     याप्रसंगी प्राचार्य रावसाहेब सातपुते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी संस्थेचे नेहमीच प्रोत्साहन असते. शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थीही उपक्रमातून शाळेचे नाव उज्वल करत असल्याचे सांगितले.


     कलाशिक्षक राज धस यांनी तयार केलेल्या शिव जिजाऊ लेझिम ग्रुपमधील विद्यार्थ्यांनींना स्व:खर्चाने स्टडी टेबल भेट देण्यात आले.  सूत्रसंचालन शंकरराव बारस्कर यांनी तर आभार राज धस यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षकवृंद, विद्यार्थी उपस्थित होते.