मौलाना अबुल कलाम आझाद सप्ताहचे बक्षिस वितरण संपन्न


Urdu School Ahmednagar: उर्दू साहित्य व प्रकाशने खरेदी करुन वाचण्याची आवश्यकता- हाजी शौकत तांबोली



अहमदनगर - भौतिक सुख सुविधांसाठी जसे आम्ही आर्थिक तरतूद करत असतो, त्याचप्रमाणे उर्दू भाषेची पुस्तके, साहित्य, वृत्तपत्र व प्रकाशने खरेदी करण्यासाठी प्रत्येक उर्दू वाचता, लिहिता, बोलता येणार्‍या उर्दू वाचकाला तरतुद करण्याची आज अत्यंत गरज आहे. उर्दूची पुस्तके, साहित्य, प्रकाशने व वृत्तपत्र आम्हाला फुकट मिळल्यास आम्ही उर्दू बद्दल आपले बेगडी प्रेम दाखवितो. ही उर्दू प्रकाशक व साहित्यकांसाठी दुर्दैवी बाब आहे. उर्दू साहित्य व प्रकाशने विकत घेऊन वाचण्याची सवय लावणार नाही, तो पर्यंत उर्दू भाषेचा विकास होणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हाजी शौकत तांबोली यांनी केले.

मखदुम एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटी व अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्यावतीने स्वातंत्रता सेनानी भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त कौमी एकता सप्ताह मध्ये घेण्यात आलेल्या निबंध चित्रकला व वक्तृत्व स्पर्धचे बक्षीस वितरण करण्यात आले. 

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मोहम्मदीया एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक प्रमुख कार्यवाह प्रा डॉ अब्दुस सलाम सर, मौलाना आजाद महोत्सव समितीचे अध्यक्ष सय्यद खलील,सचिव निसार बागवान, रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेच्या सहसचिव डॉ कमर सुरुर, सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेचे मुख्याध्यापक सय्यद नौशाद, मौलाना इजतीयादुद्दीन आदि मान्यवर उपस्थित होते. अहमदनगरमधील सर्व उर्दू प्राथमिक शाळेत घेण्यात आलेल्या निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूरुवात कुराण पठन हम्द नाआतने झाली.

प्रास्तविक करतांना मखदुम सोसायटीच्या सचिव डॉ.कमर सुरुर म्हणाल्या सोसायटीच्या माध्यमातून उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात असतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील शिक्षकांव्यतिरिक्त उर्दू भाषिक मोठ्या उत्साहाने यात सहभागी होतात. संस्थेच्यावतीने इतर भाषिकांसाठी उर्दू शिकवणी वर्ग, मुशायरे, उर्दू साहित्यीकांचे जन्म दिवस, पुस्तक मेळावे, मुलांसाठी उर्दू साहित्याची पुस्तके प्रत्येक महिन्यास उपलब्ध करुन दिली जातात. तसेच आरोग्य शिबीराचेही आयोजन केले जातात, त्यास विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिकांचाही मोठा सहभाग असतो. यासाठी अनेकांचे सहकार्य लाभते, त्यामुळे संस्थेस उपक्रम राबविण्यास प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

विजेते पुढील प्रमाणे (अनुक्रमे) :
चित्रकला स्पर्धा गट पहिला प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा केडगाव ची खान मारीया मुख्तार, सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळेची शेख मिसबा ताहेर, जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा दर्गादायऱ्याची नुरीन मोहसिन सय्यद, गट दुसरा जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा फकीरवाडा ची मुन्नजा शकील अन्सारी,सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळा मुकुंद नगरची पठाण सबा आरिफ, जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा केडगाव ची खान जोया अब्दुल्ला, गट तिसरा सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळा मुकुंदनगरची शेख मोहम्मदी फातेमा शमशाद आलम, सर सय्यद अहमद खान उर्दू प्राथमिक शाळा आलमगीरची अदीबा मुजफ्फर पठाण व महात्मा गांधी उर्दू स्कूल कॅन्टोन्मेंट बोर्ड भिंगारची शेख जैनब जुबेर यांना मिळाले. तर वक्तृत्व स्पर्धेत गट पहिला महात्मा गांधी उर्दू स्कूल कॅन्टोन्मेंट बोर्ड भिंगारची सय्यद नबीरा आजम, शेख अबरार जीशान तर जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा फकीरवाड्याची नशरा रेहान सौदागर, गट दुसरा महात्मा गांधी उर्दू स्कूल कॅन्टोन्मेंट बोर्डचा शेख अब्दुल्ला अश्फाक, शेख जैनब समीर व जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा फकीरवाडा ची खतीजा रहमान सौदागर, गट तिसरा महात्मा गांधी उर्दू स्कूल कॅन्टोन्मेंट बोर्डची शेख महेक हुसेन, सर सय्यद अहमद खान उर्दू स्कूल आलमगीर ची राहीन शकील खान व सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळा मुकुंदनगरची बागवान इफत सरफराज यांनी मिळविले.तर निबंध स्पर्धेत गट पहिला महात्मा गांधी स्कूल कॅन्टोन्मेंट बोर्ड ची सय्यद नबीरा आजम, गट दुसरा जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा फकीरवाडा ची पठाण रुकैय्या लतीफ, सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळा मुकुंदनगरची राजे अस्मिरा असीर, शेख फातिमा हिमायुद्दीन, गट तिसरा सावित्रीबाई फुले उर्दू कन्या शाळा मुकुंदनगरची शेख फरहत जहां जाकीर, जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा फकीरवाडा ची खान खुतेजाबानो जाकीर अली व जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा दर्गादायराची बीबी उजमा खातून मोहम्मद फारूक यांनी पटकाविले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद दुले खान यांनी करुन आभार मानले.