आम आदमी पार्टी च्या सभासद नोंदणीला अहमदनगरकरांचा उत्तम प्रतिसाद
अहमदनगर (प्रतिनिधी) - आम आदमी पार्टीच्यावतीने अहमदनगर शहरात सभासद नोंदणीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी दिल्लीगेट, श्रमिकनगर, नगर कॉलेज परिसरात या नोंदणीस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष भरत श्रीराम खाकाळ, महिला अध्यक्षा अॅड.विद्या शिंदे, महासचिव दिलीप घुले, उपाध्यक्ष गणेश मारवाडे, नितीन लोखंडे, कला-सांस्कृतिक आघाडी अध्यक्ष प्रकाश वडवणीकर, व्यापारी आघाडी अध्यक्ष राजेंद्र समाल, मिडिया संयोजक विजय बोरसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी भरत खाकाळ म्हणाले, हुकूमशाहीला विरोध आणि लोकशाहीला वाचवण्यासाठी आम आदमी पार्टी हा पर्याय असून, सध्याच्या सत्ताधारी आणि विरोधक हे जनतेला मुर्ख बनवत आहेत. नागरिकांच्या प्रश्नांशी त्यांना काहीही देणे-घेणे राहिले नाही. त्यामुळे आम आदमी पार्टी हा पर्याय जनतेपुढे असल्याने नागरिक पक्षाशी जोडले जात आहे. सभासद नोंदणीस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याचे श्री.खकाळ यांनी सांगितले.
यावेळी प्रकाश वडवणीकर म्हणाले, आम आदमी पाटीच्या सभासद नोंदणीस शुभारंभ झाला असून, दिल्लीगेट या ठिकाणी 100 च्या वरती सभासदांनी नोंदणी करून आम आदमी पार्टीचे हात बळकट करत असल्याचे सांगितले.
यावेळी अॅड.विद्या शिंदे यांनी पुढील काही दिवस अहमदनगर शहरातील विविध भागात सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये सामील होण्यासाठी मो.9890749197 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन केले.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com