अहमदनगरमध्ये रविवारी अपूर्वा निषाद आणि अभय जोधपूरकर यांचा ‘सोलफुल क्लासिक्स’ गाण्यांचा कार्यक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी) - अहमदनगर येथे प्रथमच पार्श्वगायक अपूर्वा निषाद आणि अभय जोधपूरकर यांचा बहारदार गाण्यांचा कार्यक्रम रविवार 17 मार्च रोजी माऊली सभागृहात संध्याकाळी 6 वाजता होणार आहे.
अपूर्वा निषाद हिने पंडित सुरेश वाडकर, संगीतकार अशोक पत्की, डबु मलिक यांच्याकडून गायनाचे धडे घेतले आहेत. एकूण पाच भाषेत रिलीज झालेल्या कुरुक्षेत्र चित्रपटाच्या हिंदी गाण्यापासून अपूर्वा च्या गायनाची सुरुवात झाली आहे. त्यानंतर भोजपुरी, हिंदी, मराठी अशी अनेक गाणी तिने गायली आहेत. ए.व्ही. प्रफुलचंद्रा, डबु मलिक, श्रेयस पुराणिक, हितेश मोडक, नितीन उघलमुगले, अशोक पत्की, व्ही.हरिकृष्णा, हिमांशू कोहली, पद्मनाभ गायकवाड यासारख्या दिग्गज संगीतकारांच्या दिग्दर्शनाखाली अपूर्वा निषादने पार्श्वगायन केले आहे. आगामी हिंदी चित्रपट दुकान, ब्रह्मास्त्र यामध्ये ती गायली आहे; तर झी मराठी वाहिनीवर ‘तू चाल पुढं’, हृदयी प्रीत जागते या मालिकेसाठी तिने आवाज दिला आहे. शिवाय स्टार प्रवाह वरील लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेचे शीर्षक गीत गायले आहे.
अवधुत गुप्ते यांच्या सोबत तिने मनसेचे अत्यंत लोकप्रिय ठरलेले ‘धाक जरी नजरेत, काळजात आभाळमाया’ हे गाणं गायलं आहे. अयोध्येत रामलल्लाची मूर्ती विराजीत होत असताना संपूर्ण विश्व राममय झालेलं होतं त्यावेळी सोशल मीडियावर प्रचंड गाजत असणार ‘रामा ओ रामा’ हे गाणं स्वतः अपूर्वा निषाद ने कंपोज करुन गायलेले आहे.
तसेच अभय जोधपूरकर पार्शगायक म्हणून फिल्म इंडस्ट्रीत लोकप्रिय आहे. झिरो या चित्रपटाचे ‘जब तक जहाँ में’ हे ब्लॉकबस्टर हिट गाणं दिलेले आहे. तर ‘दबक्या पावलांनी आली’ हे मिस्किल गाणं देखील अभय जोधपूरकर याने गायलेले आहे. हिंदी, मराठी, तामिळ, तेलुगु या सर्व इंडस्ट्रीमध्ये गायक म्हणून अभय जोधपूरकर प्रसिद्ध आहे.
अशा या नावाजलेल्या जोडी चा भव्य असा वाद्यवृंदासह सोलफुल क्लासिक्स हा नव्या आणी जुन्या लोकप्रिय गाण्यांचा बहारदार नजराणा नगरमध्ये सादर होणार आहे.
या कार्यक्रमासाठी ब्लॉसम बॉक्स, मिडास सुझुकी, स्लिपीझी, महावीर ग्रुप, स्टार हेल्थ, बांगडीवाला युनिट्री, प्रो-टेक सिक्युरिटी, पी.एन.जी., साईदिप, कॉनप्लेक्स, हॉटेल अर्थ, शबरी इंडस्ट्रीयल केटरिंग, स्वामी ट्रॅव्हल्स, स्वीट होम, दर्शना ट्रेडिंग कंपनी, सॅन व्हिजन, रेडिओ सिटी, अहमदनगर स्टोरीज, अहमदनगर ट्रेन्डस, दैनिक समाचार यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून सदर कार्यक्रमाचे पासेस राज ऑप्टिकल, प्रोफेसर चौक येथे उपलब्ध आहेत. तरी सर्व रसिक नगरकरांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन संयोजक आर्क एंटरटेनमेंट ऋतुजा रविंद्र, ज्ञानेश शिंदे, प्रा. प्रसाद बेडेकर, डॉ.स्मिता भुसे, संदीप भुसे यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com