अहमदनगर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. भक्ती बोरुडे हिची पुरवठा निरीक्षक पदी निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासन ,अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या सरळ सेवा भरती प्रक्रियेत अहमदनगर महाविद्यालय अहमदनगर, अर्थशास्त्र विभागाची विद्यार्थिनी कु. भक्ती भगवान बोरुडे हिची निवड पुरवठा निरीक्षक पदी करण्यात आली.
या निमित्ताने आज तिचा सत्कार अर्थशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आला .यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . आर जे . बार्नबस, अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा . डॉ . पराग कदम, प्रा .डॉ . भागवत परकाळ आणि प्रा . डॉ . माधव शिंदे हे उपस्थित होते.
सदरील विद्यार्थ्यांनी 20 -2021 यावर्षीअहमदनगर महाविद्यालय अहमदनगर येथील एम . ए अर्थशास्त्र (पदव्युत्तर ) या विषया मध्ये शिक्षण घेतले .

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com