अवतार मेहेरबाबा अहमदनगर सेंटरचा २९ जूनला ६५ वा वर्धापन दिन

Avtar Meherbaba: अवतार मेहेरबाबा अहमदनगर सेंटरचा २९ जूनला ६५ वा वर्धापन दिन

  


अहमदनगर (प्रतिनिधी) : बंद पडलेली दीपाली टॉकीजच्या झेंडीगेटच्या पाठीमागे आणि अहमदनगर मनपाची अधिकृत सरोश बागे जवळ सरोश पेट्रोल पंप शेजारी जागतिक संत अवतार मेहेरबाबा यांचा अहमदनगर सेंटर असून मेहेरबाबा यांना मानणारे भाविक भक्त अमेरिका,लंडन,पॅरिस,ऑस्ट्रेलिया,इटली फ्रांस, आयरलँड ,फिनलँड, लैक्सबर्ग, पोलंड,बार्बाडोस,कॅनडा,डेन्मार्क,रशिया,जर्मनी,ईराण,इराक तसेच जगभरातील विविध देशातून अहमदनगरच्या शहरातील मध्यवस्तीत असलेल्या या सेंटरवर त्याकाळीही येत होते आणि आजही येत असतात. 


अवतार मेहेरबाबा यांच्या अरणगाव  येथील मेहराबाद आणि मेहेराझाद या केंद्राबरोबरच अहमदनगर शहरातील मध्यवस्तीतले हे मेहेरबाबा सेंटर वर मेहेरबाबा यांनी आपल्या जीवनातील अत्यन्त बहुमूल्य वेळ याठिकाणी व्यतित केला आणि अहमदनगर महानगरपालिकेच्या हद्दीतील असणारे हे केंद्र मेहेरबाबा होते तेव्हापासूनच जगभरातील त्यांना मानणारे भाविक भक्त या अहमदनगर शहरातील सेंटरवर काही दिवस मुक्काम करत आणि बाबांचे साथीने याठिकाणी राहत होते त्याच बरोबर मेहराबादला मेहेरबाबा यांची समाधी आहे.


अहमदनगर मनपा हद्दीतील बंद पडलेली दीपाली टॉकीज झेंडीगेट च्या मागे आणि अहमदनगर मनपा सरोश बागे जवळ सरोश पेट्रोल पंप पाठीमागे  असणाऱ्या या सेंटरचे उदघाटन स्वतः मेहेरबाबा यांच्या हाताने झाले होते. 


                         सरोष पेट्रोल पंपाशेजारील अवतार मेहेरबाबा अहमदनगर  केंद्राचा २९ जूनला ६५ वा वर्धापन दिन असून त्यानिमित्ताने संध्यकाळी ६ ते ९ यावेळेत  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये भजन,आरती,प्रार्थना,सुगमसंगीत गायन,शास्त्रीय व भक्तीगीत गायन,वादन,कव्वाली गायन,भजने व अभंग वाणी तसेच नृत्य कार्यक्रम सादर केले जाणार आहे अशी माहिती  सेंटरचे अध्यक्ष मेहेरनाथ कलचुरी यांनी दिली 


          मेहेर  बाबाचे जगात सेंटर होते पण अहमदनगरमध्ये नव्हते तेव्हा मेहेरबाबानी सेंटर स्थापन करण्याची सूचना केली मग मेहेरप्रेमींच्या घरी दर शनिवारी सेंटर सुरु करावयाचे ठरले पहिला प्रोग्राम माणिक हाथीदारू यांच्या येथे झाला मग शास्त्री मॅडम,भगीरथ तिवारी आदी मेहेरप्रेमींच्या घरी सेंटर झाले असे २० जून पर्यत प्रोग्राम झाले


            पण त्याकाळी वाहनांची व संवादाची सुविधा जास्त नवहती त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य नव्हते मग आदी इराणी याना जागा मागण्यात आली त्यांनी अहमदनगर मनपा हद्दीतील बंद पडलेली दीपाली टॉकीज, झेंडीगेट च्यामागे आणि अहमदनगर मनपा सरोश बागे जवळ सरोश पेट्रोल पंपाशेजारील या जागेतील एक खोली दिली २९ जूनला सेंटर भरून पहिला प्रोग्राम झाला व सेंटर सुरु झाले या सेंटरचे उदघाटन अवतार मेहेरबाबानी केले होते.  


   वर्धापन दिन कार्यक्रमास मेहेरप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन सेंटरचे पदधिकारी व सदस्य यांनी केले आहे