श्री ज्ञानसरस्वती संगीत निकेतनचे गायन-वादन परीक्षेत घवघवीत यश
अहमदनगर (प्रतिनिधी) - अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ आयोजित शास्त्रीय गायन वादन परीक्षांच्या सत्र एप्रिल - मे 2024 च्या निकालामध्ये दिल्लीगेट व पाईपलाईन रोड येथील ‘श्री ज्ञानसरस्वती संगीत निकेतन’ च्या विद्यार्थ्यांनी क्लासची उज्ज्वल परंपरा कायम राखत संचालिका संपदा चौधरी यांच्या मार्गर्शनाखाली यश संपादन केले आहे.
निकाल पुढीलप्रमाणे : गौरांगराज आरगोंडा (प्रवेशिका प्रथम) हार्मोनियम विशेष योग्यतेसह केंद्रात तृतीय. पार्थ अभिजित ऋषी (प्रवेशिका पूर्ण) गायन -विशेष योग्यतेसह केंद्रात द्वितीय. रिद्धी दिनेश गांधी (प्रवेशिका पूर्ण) गायन - प्रथम श्रेणी सह केंद्रात चतुर्थ.
ओजस अपूर्व गुजराथी (मध्यमा पूर्ण) सिंथेसायझर - प्रथम श्रेणी सह केंद्रात प्रथम. मनस्वी प्रकाश लगड (मध्यमा पूर्ण) गायन - प्रथम श्रेणीसह केंद्रात द्वितीय. दीप्ती दयावनपेल्ली (विशारद प्रथम) गायन-प्रथम श्रेणीत केंद्रात प्रथम.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे निकेतनच्या संचालिका संपदा चौधरी आणि मान्यवरांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com