सामाजिक कार्यकर्ते अनंतराव गारदे यांचा‘अनामप्रेम’मध्ये वाढदिवस साजरा
अहमदनगर (प्रतिनिधी) - शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी पक्षाचे अहमदनगर उद्योग व्यापार सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अनंतराव गारदे यांचा 68 वा वाढदिवस स्नेहालय संचालित अनाम प्रेम संस्थातर्फे साजरा करण्यात आला. याप्रसंगी अनामप्रेमचे अध्यक्ष अजित माने, संचालक अभय रायकवाड, व्यवस्थापक-उमेश पंडुरे, डॉ. मेघना मराठे, अमृत भुसारी, सचिन गारदे आदि उपस्थित होते.
यावेळी अजित माने म्हणाले, अनामप्रेम ही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून समाजातील गरजू अंध, मुकबधीर मुलांच्या उन्नत्तीसाठी काम करत आहेत. या कार्यात अनेकांचे सहकार्य मिळत आहे. या मदतीच्या माध्यमातून मुलांना स्वावलंबी बनवत आहोत. अनंतराव गारदे यांचे सामाजिक, राजकीय क्षेत्रात चांगले योगदान राहिले आहे. आमच्या संस्थेसही ते नेहमीच मदतीचा हात देत असतात. त्यांचा वाढदिवस संस्थेच्यावतीने साजरा करुन त्यांना दीर्घाष्य लाभण्यासाठी प्रार्थना केली असल्याचे सांगितले.
याप्रसंगी अनंतराव गारदे म्हणाले, सामाजिक जीवनात काम करीत असताना एकमेकांचे सुख-दुःखात आपल्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे सहकार्य करीत राहणे ही सामाजिक बांधिलकी समजून काम केले पाहिजे. अनामप्रेम या संस्थेचे माझे 30 वर्षांपासून संबंध असून वेळोवेळी त्यांना सहकार्य करुन त्यांच्या चांगल्या कार्यास हातभार लावण्याचे काम केले आहे. आपला वाढदिवस अनामप्रेम संस्थेने साजरा केला हे कधीही विसरु शकत नाही. संस्थेच्या कार्यास यापुढेही असेच सहकार्य राहील, असे सांगितले.
सूत्रसंचालन निलेश शिंदे यांनी केले तर आभार आनंद माळवे यांनी मानले. यामुळे मुलांनी श्री.गारदे यांचे औक्षण करुन केक कापला.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com