भगवान फुलसौंदर यांच्या पुढाकारातून मोफत योग व आरोग्य सप्ताहाचा प्रारंभ 


नक्षत्र लॉन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न



          अहमदनगर (प्रतिनिधी) - बुरुडगाव रोडवरील नक्षत्र  लॉन येथे दहाव्या  आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न झाला या दिनाचे औचित्य साधून नगरमधील प्रथम महापौर भगवानराव फुलसौंदर मित्र मंडळ व नक्षत्र प्राणायाम परिवार च्या वतीने  पाच दिवसीय मोफत योग व आरोग्य साधना सप्ताह चा प्रारंभ हि करण्यात आला यावेळी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर ,अविनाश ठोकळ रघुनाथ केदार प्रकाश इवळेमधुकर निकमअशोक बाबर,श्री मुळे ,सी ए राजेंद्र काळे,लक्ष्मण आव्हाड,गोरख चौधरी,साहेबराव बोरुडे,शंकरराव वाघमारे,सुनील फुलसौंदर आदी सह मोठ्या संख्नेने नगरकर उपस्थित होते.

 

          फुलसौंदर यावेळी बोलताना म्हणाले नगर शहर निरोगी करणे या उद्दिष्टाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आज जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ,विविध रोग होऊ नये यासाठी उपाय या शिबिरातून समजणार असून व आपल्या शरीर किमती असून त्याला त्याला चांगले वळण आहार व्यायाम ची गरज आहे  त्यासाठी गेली बारा वर्षापासून आम्ही या ठिकाणी वर्ग घेत आहोत तरी  नगरकरांनी याचा लाभ घ्यावा.

 

        नागरिकांच्या आरोग्यदायी जीवनासाठी आजपासून  २५ जुन २०२४ पर्यंत हे शिबीर असून  यामध्ये योगध्यान धारणा व आरोग्य विषयक तज्ञाचे मार्गदर्शन होणार आहे,  नक्षत्र लॉनबुरूडगाव रोडनगर येथे सकाळी ०५.४५ ते ७.४५ पर्यंत होणार आहे आज आचार्य राहुल ठोकळ(योग तज्ञ),कर्नल सोमेश्वर गायकवाड(एम.डी. मेडिसीन)यांचे शुगरउच्च रक्तदाबकॉलेस्ट्रॉल यावर व्याख्यान संपन्न झाले.

 

                दि. २२ जुन रोजी  उदय वाणी किसान सेवा समिती),डॉ. अनिकेत कटारिया(हृदय रोग तज्ञ)यांचे हृदयरोग कारण व निवारण,दि.२३ जुन रोजी  आचार्य अतुल आर्य(युवा भारतपुणे),डॉ.हेमा सेलोत(निसर्गोपचार तज्ञ) यांचे आहार व पंचभौतिक उपचार,दि.२४ जुन रोजी प्रा.बाळासाहेब निमसे(पतंजली योग समिती),डॉ. सतीश सोनवणे(कॅन्सर तज्ञ)यांचे कॅन्सर प्रतिबंधक उपाय,दि.२५ जुन रोजी  विशाल ठोकळ(मनशक्ती प्रशिक्षक),डॉ.सुधाताई कांकरिया यांचे आनंदी जीवनाची गुरुकिल्ली,राजयोग मेडीटेशन यावर मार्गदर्शन होणार आहे.

 

            अनमोल अशा या आरोग्य व योगाची महती विशद करणाऱ्या सोहळ्यास आपण ही या आपल्या कुटुंबिय व मित्र परिवारसह सहभागी व्हावे असे आवाहन भगवानराव फुलसौंदर मित्र मंडळ  व नक्षत्र प्राणायाम परिवारच्या वतीने करण्यात आले आहे