राज्यस्तरीय पुरुष लावणी स्पर्धेत राजेश व्यवहारे द्वितीय
अहमदनगर (प्रतिनिधी) - लिनियर फिल्म आयोजित श्री. व सौ.बंदावणे यांच्यावतीने संगमनेर येथे पुरुष नर्तक लावणी स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये महाराष्ट्र मधून 22 स्पर्धक निवडले होते. या स्पर्धेत नगर मधील राजेश व्यवहारे यांनी ‘जरा खाजवा की...’ ही लावणी सादर करुन द्वितीय क्रमांक पटकाविली. याप्रसंगी मेघराज राजे भोसले, माजी आ.सुधीर तांबे, परीक्षक गीतगार बाबासाहेब सौदागर आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बाबासाहेब सौदागर म्हणाले, लावणी ही महाराष्ट्राची एक लोककला आहे. या लोककला ग्रामीण भागापासून शहरापर्यंत पोहचविण्याचे काम कलाकार करत आहेत. लावणी ही महिला सादर करतात परंतु या स्पर्धेनिमित्त पुरुषांची लावणी ही आगळी-वेगळी स्पर्धा लावणीचे अदाकारी अधोरेखित करणारी आहे.
सर्वच कलाकारांनी अतिशय सुंदर नृत्य प्रदर्शन केले आहे. राजेश व्यवहारे यांनी सादर केलेल्या लावणीने सर्वांचीच मने जिंकली, अशा शब्दात गौरव केला असल्याचे सांगितले.
राजेश व्यवहारे यांनी आजपर्यंत अनेक राज्यस्तरी, जिल्हास्तरीय स्पर्धा, कार्यक्रमात भाग घेत 500पेक्षा जास्त बक्षीस मिळविली आहे. पुरुष नर्तक लावणी स्पर्धेतील त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com