Sarda College | शिष्यवृत्तीने विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि भविष्य दोन्ही उज्ज्वल होईल – प्राचार्य डॉ.माहेश्वरी गावित

 पेमराज सारडा महाविद्यालयात भारत सरकार शिष्यवृत्ती विशेष पंधरवडा शिबिराचे आयोजन 

Sarda College | शिष्यवृत्तीने विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि भविष्य दोन्ही उज्ज्वल होईल – प्राचार्य डॉ.माहेश्वरी गावित






नगर : दर्शक ।
महाराष्ट्र शासन व भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार शिष्यवृत्ती विशेष पंधरवडा शिबिराचे आयोजन पेमराज सारडा महाविद्यालय नगर येथे करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोप कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित यांनी सर्व पात्र विद्यार्थ्यांनी भारत सरकारच्या विविध शिष्यवृत्तींचा लाभ घेऊन आपले शिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन केले.



     डॉ. गावित पुढे म्हणाल्या की, आज भारत सरकारच्या अनेक सवलती व शिष्यवृत्ती ऑनलाईन माध्यमातून वेबपोर्टलवर उपलब्ध आहेत. मात्र माहितीअभावी किंवा दिरंगाईमुळे अनेक विद्यार्थी या सुविधांपासून वंचित राहतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरणे, कागदपत्रे अपलोड करणे अथवा ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी येत असतील त्यांनी महाविद्यालयातील शिष्यवृत्ती विभागाशी संपर्क साधून योग्य माहिती घ्यावी व संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा.



      यावेळी शिष्यवृत्ती शिबिराच्या समन्वयक डॉ. सुरेखा गांगुर्डे यांनी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या विविध शिष्यवृत्ती, आवश्यक कागदपत्रे, तसेच विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या चुका व दिरंगाईमुळे होणारे नुकसान याबाबत सविस्तर माहिती दिली.



      कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रबंधक श्री. अशोक असेरी उपस्थित होते. ऑनलाईन फॉर्म भरण्यात अडचण आल्यास थेट संपर्क साधण्याचे आवर्जून त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच शिष्यवृत्ती फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेत कोणत्या चुका टाळाव्यात, कोणती कागदपत्रे लॉगिनवर अपलोड करणे आवश्यक आहे, याबाबत श्री. वसंत शिंदे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. काही विद्यार्थ्यांचे प्रोफाईल तयार करून प्रत्यक्ष फॉर्म भरून दाखवत त्यांनी प्रात्यक्षिक स्वरूपात मदत केली.



      या शिबिरास मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. श्री. दिलीप संत्रे यांनी शिबिराच्या आयोजनासाठी विशेष सहकार्य केले. शिष्यवृत्ती विशेष पंधरवडा शिबिराबाबत हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, मानद सचिव श्री. संजय जोशी, वरिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. रमेश झरकर, ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन डॉ. पारस कोठारी यांनी आयोजकांचे व मार्गदर्शकांचे कौतुक केले.
     कार्यक्रमाचे आभार श्री. वसंत शिंदे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या