Ahmednagar Sports: आठरे पाटील पब्लिक स्कूल आंतरशालेय सुब्रतो मुखर्जी फूटबॉल स्पर्धेत अजिंक्य
अहमदनगर (प्रतिनिधी) -येथील वाडिया पार्क मैदानावर घेण्यात आलेल्या आंतरशालेय सुव्रतो मुखर्जी फूटबॉल स्पर्धेत आठरे पाटील पब्लिक स्कूलच्या 15 वर्षाखालील मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात आयकॉन पब्लिक स्कूलच्या संघाला 2 वि. 0 गोलनी पराजीत करुन अजिंक्यपद पटकाविले. या विजयात संघातील खेळाडू चंद भानुदास,चंद अशोक यांनी सिंहाचा वाटा उचलला.
याच मैदानावर दिनांक 23 ते 24 जुलै, 2024 या कालावधीत घेण्यात आलेल्या आंतरशालेय 17 वर्षा खालील मुलींचा फूटबॉल संघ उपविजेता ठरला.या कालावधीतच 17 वर्षा खालील मुलांच्या फूटबॉल संघाने तृतीय क्रमांक पटकावला.आंतरशालेय सुब्रतो मुखर्जी फूटबॉल स्पर्धेत शाळेच्या खेळाडूंनी आपल्या अप्रतिम क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले.अजिंक्यपद पटकाविलेलया 15 वर्षाखालील मुलांच्या संघाची पुणे विभागीय फूटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली.
या सर्व विजयी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिल आठरे पाटील,कार्यकारी विश्वस्त अॅड. विश्वासराव आठरे पाटील व सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक, प्राथमिकच्या विभाग प्रमुख, समन्वयक, पर्यवेक्षिका, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी अभिनंदन केले.फूटबॉलच्या तिन्ही संघास क्रीडा शिक्षक श्री. दरंदले संदीप यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com