भाग्यविधाता कर्मयोगी पुस्तकाचे प्रकाशन
अहमदनगर (प्रतिनिधी) - प्रार्थना समाजच्या अध्यक्षा शशिकला बागडे लिखित मंगल भक्त सेवा मंडळाचे अध्यक्ष, एमआयडीसीच्या मंगल दत्तक्षेत्राचे प्रमुख राजाभाऊ कोठारीयांच्या वरील भाग्यविधाता कर्मयोगी पुस्तकाचे प्रकाशन जेष्ठ सेवेकरी अशोक लूनावत,दिलीप खोलेसंजय उदावंतराजू क्षीरसागर ,नरेश शहा,जयंत पारेख आदींच्या हस्ते झाले
पुस्तकामध्ये एफ 70 येथील औदुंबर वृक्षाचे महत्व,राजाभाऊ कोठारी यांना झालेली शंकर महाराजांची कृपादृष्टी,दत्त महाराज कृपादृष्टी व दर्शन कसे झाले,अध्यात्मिक कार्य कसे सुरु झाले व सध्याच्या एमआयडीसीतील मंगल दत्त क्षेत्र विषयीची माहिती या पुस्तकात आहे.
याविषयी शशिकला बागडे आपल्या मनोगतात लिहितात कि राजाभाऊ एक राजयोगी म्हटल तर वावग होणार नाही. त्यांचे सर्व कार्य राजस आहे. आयुष्याची सुरवात जरी खोडकर म्हणून झाली, तरी आजच त्यांचे व्यक्तिमत्त्व पाहिल्यावर आधुनीक ऋषीतूल्य जीवन जगतात बघणे हे माझ भाग्य मला वाटते. व्यसनमुक्तीचा नारा करण्यापेक्षा प्रत्यक्ष एखाद्या शिल्पाला साज चढवावा तसे त्यांनी प्रत्येक जीवाला जगण्याच अर्थ सांगितला.
आज सगळीकडे नैराश्य वृत्तीने जगणे पाहण्यात येते. त्यामुळे गुन्हे होतात. आत्महत्या, अस समाज निर्मिती भासते. अशा ह्या अंधार-युगाचा अस्त होण्यासाठी जणू श्री अवधूत शंकर बाबांनी राजेशच्या हाती हा दिप-ज्योतिचा प्रकाश दिला. त्यामुळे व्यसन मुक्तीचा राजमार्ग राजाभाऊनी-अज्ञानी बंधू- बांधवांना दिला. जणू सत्य-युगाला सुरुवात झाली. असे माझे ठाम मत आहे. त्यात त्यांच्या कुटुंबांचे खूपच सहकार्य आहे.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com