Ahmednagar Sports: नवीन लोगो अहमदनगर जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीचे प्रतीक म्हणून समोर येईल : आ.संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी) : अहमदनगर जिल्हा ऑलिंपिक असोसिएशनच्या लोगोचे अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी बोलताना आ.जगताप म्हणाले कि हा नवीन लोगो आपल्या जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीचे प्रतीक म्हणून समोर येईल. अहमदनगर जिल्हा ऑलिंपिक असोसिएशनने सर्वसमावेशक असा लोगो तयार केला असून यातून सांघिकतेची भावना निर्माण झाली आहे.
जिल्ह्यासह शहरात चांगले खेळाडू निर्माण व्हावे, यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून वाडिया पार्क येथे सर्व प्रकारच्या खेळांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ५१ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झाला असून यातील १५ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. त्यातून खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील.
पूर्वीच्या काळी क्रीडा क्षेत्राला म्हणावे तेवढे महत्त्व नव्हते. आता प्रत्येक खेळासाठी प्रशिक्षक निर्माण झाले आहेत. क्रीडा क्षेत्रात सध्या खेळाडूंना प्रोत्साहन व प्रेरणा मिळत आहे. चांगले खेळाडू आपल्या सर्वांना मिळून घडवायचे आहेत. अहमदनगर जिल्ह्याने सर्वच क्षेत्रात चांगली कामगिरी करत देशाच्या प्रगतीत मोठं योगदान दिले आहे. अहमदनगर जिल्हा ऑलिंपिक असोसिएशनच्या माध्यमातून ५६ क्रीडा संघटना एकत्रित येत जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून देत आहेत. त्यातून चांगले खेळाडू निर्माण करीत आहे,
खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे काम प्रेक्षक वर्गातून होत असते. मुंबई येथे भारतीय क्रिकेट टीमने टी-२० वर्ल्ड कप जिंकून आल्यानंतर प्रेक्षकांनी जल्लोषात स्वागत केले. त्या माध्यमातून खेळाडूंना ऊर्जा व प्रेरणा मिळत असते .
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, ज्ञानेश्वर खरंगे, निर्मल थोरात, विलास दवणे, प्रा. संतोष भुजबळ, रावसाहेब बाबर, संजय धोपवकर, अविनाश काळे, प्रशांत गंधे, निलेश कुलकर्णी, विशाल गर्जे, सतीश झेंडे, शैलेश गवळी, निलेश मदने आदींसह खेळाडू व विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com