रोटरी क्लब ऑफ अहमदनगर शाखेचा ७७ वा पदग्रहण कार्यक्रम संपन्न
अहमदनगर (प्रतिनिधी) -रोटरी क्लब ऑफ अहमदनगर शाखेचा ७७ वा पदग्रहण सोहळा सावेडी येथील मेरीलँड सभागृहात संपन्न झाला.या कार्यक्रमामध्ये वर्ष २०२४-२५ साठी नवनियुक्त अध्यक्ष रो.नितिन थाडे व सचिव रो.सुभाष गर्जे यांनी मावळते अध्यक्ष रो.माधव देशमुख व सचिव रो.दिपक गुजराथी यांच्या कडून विधिवत पदक व कार्याची सूत्रे स्वीकारली. या वेळेस व्यासपीठावर रेमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित पद्मश्री निलीमा मिश्रा,डॉ. गिरीश कुलकर्णी, डॉ. बापुसाहेब कांडेकर प्रशांत अहीर,माजी उपाध्यक्ष रिलायन्स उद्योगसमूह आदी मान्यवर उपस्थित होते.
रो.माधव देशमुख यांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे स्वागत करतांना गतवर्षीच्या भरगच्च उपक्रमांचा धावता आढावा घेतला,रो.दिपक गुजराथी यांनी रोटरी क्लबला सहकार्य केलेल्या व्यक्तिंचा व विशेष्त्वे रो.डॉ.प्रकाश कांकरिया दांपत्यांचा उल्लेख केला.रो.नितिन थाडे यांनी अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतांना आपल्या भाषणात रोटरी डिस्ट्रिक्ट प्रांतपाल डॉ.सुरेश साबु यांनी दिलेल्या नई दिशाये,नई आशाये नया विश्वास या शिर्षकांतर्गत समाविष्ट असलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.त्यामध्ये प्रामुख्याने कर्करोग जागृकता व निदान, हॅपी स्कुल, रोटरी स्किल डेव्हलपमेंट सेंटर,पर्यावरण संकल्प,रस्ता सुरक्षा कार्यक्रम,स्वयंरोजगार, आरोग्य, शिक्षण,चित्रपट महोत्सव आदी अनेक क्षेत्रांमधील प्रस्तावित उपक्रमांची माहीती दिली.
डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी अहमदनगर ते बांगलादेश सद्भावना सायकल रॅली मध्ये रो.नितिन थाडे, रो.माधव देशमुख व रोटरी क्लबच्या सदस्यांनी केलेल्या सहकार्याच्या आठवर्णीना उजाळा दिला.रो.डॉ. बापुसाहेब कांडेकर यांनी सामाजिक वनीकरणासारख्या व्यापक व विषय केंद्रीत कार्यक्रमाची निकड असल्याचे व त्याकरिता रोटरीसारख्या संस्थेने पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे विशद केले.
डॉ महेरनाथ कल्चुरी यांनी अवतार मेहेरबाबा ट्रस्ट द्वारा अंतर्भुत असलेल्या सामाजिक कार्याचा उल्लेख करतांना रोटरी क्लबसोबत सहयोगाची अपेक्षा केली.प्रशांत अहीर यांनी मेहेरबाबांच्या निरपेक्ष प्रेम आणि निष्काम सेवा या शिकवणींना आपल्या भाषणातून अधोरेखित केले.
पद्मश्री श्रीमती निलीमा मिश्रा यांनी रोटरी इंटरनॅशनल च्या कार्याचा आवर्जुन उल्लेख करतांना जिल्ह्यामधील महिला बचत गटाच्या कौशल्यविषयक, उपजिविका विषयक कार्यक्रम अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने रोटरी क्लब सारख्या संस्थेसोबत कार्य करण्याचा मनोदय व्यक्त केला.
सदर कार्यक्रमास सर्वश्री रोटरियन कुलगुरु डॉ.सर्जेराव निमसे,जवाहर मुथा,सहायक प्रांतपाल प्रसन्न खाजगिवाले व पुरुषोतम जाधव, दादासाहेब करंजुले, निलेश वैकर, महावीर मेहेर, कौशिक कोठारी, प्रशांत बोगावत,हर्षवर्धन सोनवणे, डॉ,गुलशन गुप्ता, इश्वर बोरा, अजय पिसुटे, सुहास क्षिरसागर,रविंद्र राऊत, महेश गोपालकृष्णन, राजीव गुप्ता, शुभा बोगावत,इतिहासकार भुषण देशमुख,उद्योजक दिपक चांदोरकर यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर नागरीक व रोटरी क्लबशी संबंधित अनेक आजी-माजी पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.रो.सुभाष गर्जे यांनी आभार प्रदर्शन तसेत मेहेरबाबा केंद्राच्या सौ सुरेखा डाडर यांनी सूत्रसंचालन केले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com