डोंगरगण येथे श्रीनिवृत्तीनाथ महाराज भव्य पायी दिंडीचे आगमन
अहमदनगर (प्रतिनिधी) - मानाच्या पालखी सोहळ्यात अत्यंत महत्वाचे स्थान अर्थात वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू असणारे संतश्रेष्ठ विश्वगुरू श्रीनिवृत्तीनाथ महाराज भव्य पायी पालखीचा आज १ जुलै सोमवार रोजी सायं ०६ वाजता डोंगरगण ता नगर जि अहमदनगर येथे १२ व्या दिवसाच्या मुक्कामी अर्थात हिरव्यागार वांबोरी घाटात वारकरीमय वातावरणात निवृत्तीनाथांच्या हरीनामाचा जयघोषात घाट चढून सर्व वारकरी डोंगरगण येथे आले.
घाटातील दृश्य अतिशय जसे की निसर्गाने वारकऱ्यांच्यासाठी जणू काही शीतल छायेची छत्री धरल्यासारखी सावलीमय हिरवळमय वारकरीमय भक्तिमय वातावरण वारकऱ्यांच्यासाठी झाले होते.
पालखी वांबोरी घाट पार करून आल्यानंतर आदर्श गाव असलेल्या मांजरसुंभा चे मा सरपंच जालिंदर कदम यांनी पालखीचे पूजन करून दिंडी प्रमुखांचे स्वागत केले यावेळी अजय भुतकर सर व ग्रामस्थ उपस्थित होते . या पालखीमध्ये पारंपरिक ५१ दिंड्या आणि हजारो भाविक यात सहभागी झाले आहेत.
वारकरी भगवी पताका आणि श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज यांचा हरिनामाचा जयघोष करत पालखी मारुती मंदिरात आल्यावर तिचे स्वागत पुंडलिक महाराज जंगले शास्त्री, ज्ञानेश योगआश्रम वारकरी शिक्षण संस्था येथील बाल वारकरी ,समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ व नगरचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी केले

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com