विद्यार्थ्यांनी केले निवृत्ती नाथ दिंडीचे स्वागत
अहमदनगर (प्रतिनिधी)- संतश्रेष्ठ विश्वगुरू श्री निवृत्तीनाथ महाराज भव्य पायी डोंगरगण येथे आली असता पालखी सोहळाचे स्वागत श्री रामेश्वर ग्रामीण विद्या विकास प्रतिष्ठान डोंगरगण संचालित न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या वतीने करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष जालिंदर कदम , मा सरपंच आदर्श गांव,मांजरसुंबा, मुख्याध्यापक यशवंत भुतकर सर,विद्यार्थी शिक्षक- शिक्षकेतर वृंद, मित्र परिवार,ग्रामस्थ मोठ्या संख्नेने उपस्थित होते.
तर दिंडीत दिंडीत संस्थांनच्या अध्यक्षा ह.भ.प.कांचनताई जगताप, पालखीप्रमुख नारायण मुठाळ, विश्वस्त राहुल महाराज सांळुखे, विश्वस्त तथा प्रसिध्दीप्रमुख नवनाथ महाराज गांगुर्डे, पुजारी जयंत महाराज गोसावी, पुजारी अनिल महाराज गोसावी,मानकरी मोहन महाराज बेलापूरकर,बाळकृष्ण महाराज डावरे,निवृत्ती चोपदार,सागर दौंड,कृष्णा रायते, बैलजोडीचे मानकरी अश्वचे मानकरी आदी होते.
रस्त्याचा दुतर्फा विद्यार्थ्यांनी येणाऱ्या वारकर्यांना राम कृष्ण हरी म्हणून स्वागत केले तर घाटमाथ्यपासून ते डोंगरगण मारुती मंदिर पर्यंत दिंडी च्या अग्रभागी शाळेचे लेझीम पथकाणे लेझीम खेळत होते,शाळेमध्ये वारकऱ्यांची राहण्याची सोय करण्यात आली असून तिथेही विद्यार्थी त्यांना मदत करत आहे.
यंदा संतश्रेष्ठ श्रीनिवृत्तीनाथ महाराज यांचे जन्मोत्सवाचे ७५१ वर्ष यामुळे यावर्षी पालखी सोहळ्यात हजारो वारकरी पंढरपूरच्या दिशेने जात आहे. पायी पालखी सोहळ्यातील दिंडी सोहळा सुखकर व व्यवस्थापन चांगले होण्यासाठी शासनाच्या माध्यमातून व स्थानिक ग्रामस्थांच्या फार मोठ्या सहकार्याने निर्मल वारी,आरोग्यदायी वारी,प्लॅस्टिकमुक्त वारी,स्वच्छतादायी वारी,सुरक्षित वारी याबरोबरच अनेक व्यवस्था करण्यात येत आहे सोयीसुविधा दिल्या. त्याचाही चांगला फायदा वारकरी भाविकांना होत आहे.
आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी स्वच्छता,आरोग्य, सुरक्षा आणि पाणी पुरवठा आदी सुविधा दिल्याने पायी दिंडीचा प्रवास आनंददायी व सुखकर होत असल्याचे असे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधि संस्थानच्या अध्यक्षा ह.भ.प.कांचनताई जगताप यांनी सांगितले. सरकारने दिलेल्या वारकऱ्यांच्या सोयी सुविधामुळे वारीच्या मार्गावर होणारी गैरसोय आता दूर होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com