संत निवृत्तीनाथ पालखीचे  पोलीस अधीक्षक व चिपाडे परिवाराच्या वतीने स्वागत

संत निवृत्तीनाथ पालखीचे  पोलीस अधीक्षक व चिपाडे परिवाराच्या वतीने स्वागत




    अहमदनगर (प्रतिनिधी) -नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ पालखीचे नगरमधील  संभाजीनगर रोडवरील बारवेजवळ सनी पॅलेस येथे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तसेच   चिपाडे परिवाराच्या  वतीने स्वागत करुन पालखीची पूजाआरती करण्यात आली.यावेळी दिंडीतील वारकर्यांना  केळी,चिवडा,राजगिरा लाडू,वेफर्स या  फराळाचे व पाणी- चहाचे वाटप करण्यात आले.



                  यावेळी  पै.संदिप कर्डिले,बाबू चिपाडेपैलवान संदिप कर्डिले,जितु भाऊ गायकवाड,योगेशशेठ देशमुख,विष्णुशेठ तवलेरोहितशेठ आवारेजाधव मामा,राजु भाऊ बुधवंत,संतोष भाऊ चव्हाणकैलास भाऊ मस्केभाऊ महाराज तवलेअविनाश निकरड आदिसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

                  यावेळी  विठ्ठलाच्या प्रती असणारा भक्तीभाव प्रत्येक  वारकर्याच्या चेहर्यावर दिसत होता.पोलीस कर्मचारी  तसेच वारकरी  बांधव पण यावेळी अभंगात दंग झाले होते,पालखी येथे बराच वेळ विसावली होती. यावेळी साउंडवर भक्तिगीते लावण्यात आली होती तर लहान थोर स्वतःला विसरून येथे सेवा करत होते . गेल्या १५ वर्षांपासून चिपाडे परिवाराकडून या पालखी सोहळ्याचे स्वागत करुन सुमारे १५ हजार भक्तांना फराळाचे वाटप केले गेले .