Ahmednagar NCP: राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सचिवपदी विनोद साळवे यांची नियुक्ती

Ahmednagar NCP: राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सचिवपदी विनोद साळवे यांची नियुक्ती



     अहमदनगर (प्रतिनिधी)  - महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश संघटन सचिव या पदावर विनोद बाबुराव साळवे यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली. मुंबई येथे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी खासदार निलेश लंके, प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार आदि उपस्थित होते.


     विनोद साळवे हे ता.शेवगांव, नगर येथील रहिवासी असून, ते मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. तसेच खा.निलेश लंके यांचे विश्‍वासू समर्थक आहेत. यापुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस युवक सरचिटणीस, जिल्हा उपाध्यक्ष सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे. पक्ष संघटनेत त्यांनी वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी वेळावेळी अत्यंत निष्ठापुर्वक पार पाडली म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी देण्यात आली आहे.


     या निवडीनंतर विनोद साळवे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा.निलेश लंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आ.दादाभाऊ कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटन मजबूत करण्याचा प्रयत्नत करु. पक्षाचे ध्येय धोरणे सर्वसामान्यापर्यंत पोहविण्याबरोबर त्यांच्या प्रश्‍नांसाठी पुढाकार घेऊ असे सांगितले.


     विनोद साळवे यांच्या निवडीबद्दल आ.रोहित पवार, आ.प्राजक्त तनपुरे, माजी आ.राहुल जगताप, राजेंद्र कोठारी, प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, अशोक बाबर, शहानवाज खान, फारुक रंगरेज, प्रकाश पोटे, विद्याताई गाडेकर, डॉ.स्मिता तरटे, अ‍ॅड.शुभांगी जाधव, शेखर पंचमुख, अभिजित ससाणे आदिंसह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.