स्व. रामनाथजी वाघ यांची 93 वी जयंती संपन्न
अहमदनगर : दिनांक 1 ऑगस्ट 2024 आज रोजी जिल्हा परिषद व जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अहमदनगरचे उपाध्यक्ष व यशवंतराव चव्हाण व्यासपीठ अहमदनगरचे संस्थापक अध्यक्ष रामनाथजी तथा अण्णासाहेब वाघ यांची एक ऑगस्ट 1932 जन्मदिनांकनुसार आज 93 वी जयंती रायगड या निवासस्थानी भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
याप्रसंगी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे, उपाध्यक्ष डॉ. विवेक भापकर, सेक्रेटरी ऍड. विश्वासराव आठरे पाटील, खजिनदार ऍड. दीपलक्ष्मी म्हसे, विश्वस्त मुकेश मुळे तसेच यशवंतराव चव्हाण व्यासपीठाचे अध्यक्ष माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य खाशेराव शितोळे सेक्रेटरी प्रा पोपटराव काळे सह सेक्रेटरी प्रा अरुण गांगर्डे संघटक प्रा दशरथ खोसे ,
न्यू लॉ कॉलेज अहमदनगरचे प्राचार्य तांबे सर, मुख्याध्यापक शिरीष टेकाळे, प्रा. शिंदे ,प्रा. सुनील जाधव तसेच स्वर्गीय अण्णांची चिरंजीव डॉ. धनंजय, डॉ. सुमा तसेच डॉ. सागर ,डॉ. मृणाल व सौ. संगीता वाघ त्याचबरोबर अण्णांच्यावर प्रेम करणारे अनेक सहृदयी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी स्वर्गीय अण्णांनी आयुष्यभर सामाजिक शैक्षणिक राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या योगदानाची आठवण यानिमित्ताने उपस्थितानी केली. अशी माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सहसेक्रेटरी असलेले अण्णांचे चिरंजीव जयंत वाघ यांनी दिली.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com