Ahmednagar Shivesena: लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न दयावा - विक्रम राठोड
अहमदनगर (प्रतिनिधी) -लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे विचार आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे त्याचे कार्य पाहता त्यांना भारतरत्न मिळाला पाहिजे होता, तरी सरकारने त्यांना भारत रत्न द्यावा असे प्रतिपादन युवासेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी केले.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त लाल टाकी येथील त्यांच्या पुतळ्यास शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने युवा नेते विक्रम राठोड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी प्रथम महापौर भगवान फुलसौदर ,शहर प्रमुख संभाजी कदम,संजय शेंडगे ,संतोष गेनप्पा ,सुरेश तिवारी ,श्याम नळकांडे,सचिन शिंदे आदीसह शिवसैनिक उपस्थित होते.
अण्णाभाऊंच्या फकिरा, सातार्याचा वाघ, माकडाचा माळ, बर्याच कादंबर्या प्रसिद्ध आहेत अण्णाभाऊंच्या गोवा मुक्ती संग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळ सहभाग होता. त्यांचे कार्य सर्वसामान्यांसाठी प्रेरणादायी होते.
अण्णांच्या सहभागाने अनेक कलाकारांना व्यासपीठ प्राप्त झाले. लोकशाहीर साठे हे थोर समाजसुधारक, लोककलावंत व लेखक होते. त्यांनी शाहिरीतून मोठे योगदान दिले. त्यांनी आपल्या शाहिरितून सर्वसामान्यांच्या न्यायासाठी वाचा फोडली. म्हणून अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार द्या अशी मागणी राठोड यांनी केली.
.jpg)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com