अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने अण्णाभाऊंना अभिवादन
अहमदनगर (प्रतिनिधी) -लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने अण्णाभाऊंच्या 104 व्या जयंतीनिमित्त नगरमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.लालटाकी येथील त्यांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष विजुभाऊ पठारे,साहेबराव पाचारणे, अशोक गायकवाड,सुरेश बनसोडे,अविनाश घुले ,विजय वडागळे आदींसह मोठ्या संख्नेने समाज बांधव उपस्थित होते तसेच अनेक राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी त्यांना अभिवादन केले
आ.जगताप म्हणाले अण्णाभाऊ यांनी आत्तापर्यत 20 पेक्षा अधिक ग्रंथ अणि 25 पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या फकिरा या कादंबरीस राज्य सरकारचा 1961 सालचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कारही प्राप्त झालेला आहे,समाजसुधारक, लोककवी, लेखक, शाहीर अशी अनेक बिरुदे मिरवणारे अण्णा भाऊ साठे यांचे कार्य सर्वाना प्रेरणा देणारे आहे
सर्वसामान्यांना सहज समजेल अशा ग्रामीण भाषेतून शाहिरी करत त्यांनी आयुष्यभर वंचितांसाठी समाजप्रबोधन केले. जातीव्यवस्था आणि गरीबीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नाही, मात्र अण्णाभाऊंनी साहित्य क्षेत्रात मात्र खूप मोठी झेप घेतली. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते.असेही आ जगताप म्हणाले
पठारे म्हणाले संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे अत्यंत मोलाचे योगदान लाभले होते. पुरोगामी विचारांचा अखंड महाराष्ट्र घडवून जगात महाराष्ट्राचे नाव कोरले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. दलितांच्या गुलामगिरीच्या विरोधात आवाज उठवला होता. गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर, श्रमिक यांच्या वेदना जाणून घेऊन त्यांवर केलेले लेखन ही अण्णाभाऊ यांची विशेषता. म्हणूनच अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे.अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने जयंती दिनी विविध उपक्रम ठेवले आहे
.jpg)
.jpg)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com