योगीराज गाडे यांच्या मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटपचा हजारो लोकांना लाभ
अहमदनगर (प्रतिनिधी) |
सावेडीतील सिव्हिल हडकोतील रामकरण सारडा वसतिगृहात नगरसेवक योगीराज गाडे व थोरात आय केअर आणी अंजली चष्मावाला यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर व नंबरचे चष्मा वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी संभाजी कदम,नगरसेवक योगीराज गाडे,अशोक दहिफळे,सुरेख शिरसागर,श्री आव्हाड,बाळासाहेब जमदाडे,अभिजीत जोशी,अनिरुद्ध ठोंबरे,संदीप ठोंबरे,राज गोरे,करण पुंड, ओमकार कडूस,हर्षल अणेंचा सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
शिबिरात सुमारे ११०० च्या पुढे लोकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली तर ६०० लोकांना नंबरचे चष्मा वाटप करण्यात आले.फुलसौंदर म्हणाले हे नगरमधील गाडे यांचे हे ४ थे शिबीर आहे,
आत्तापर्यंत हजारो लोकांनी त्याचा लाभ घेतला असून हे शिबीर आता शहरात विविध ठिकाणी घेण्याचा गाडे यांचा मानस आहे त्याचे मी कौतुक करतो पूर्वी अनिलभैय्या राठोड असे शिबीर घेत असत.त्याच पद्धतीने योगीराज गाडे हे शिबीर घेत आहे
.webp)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com