मविआच्यावतीने शहरात बदलापूर घटनेचा निषेध

MVA Ahmednagar: अल्पवयीन मुली आता सुरक्षित नाही-डॉ अनिल आठरे





अहमदनगर । दर्शक : 


           बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर अत्याचार केल्याप्रकरणी महाविकास आघाडीच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले.यावेळी अहमदनगर शहरात देखील महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळाजवळ निषेध करण्यात आला.



यावेळी ठाकरे गटाचे शहरप्रमुख संभाजी कदम, काँगेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ,राष्टवादी पवार गटाचे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर,सामाजिक कार्यकर्ते डॉ अनिल आठरे,विक्रम राठोड, भगवान फुलसोंदर, बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे,सुरेखा कदम,मंगल भुजबळ, नलिनी गायकवाड़, सुरेश तिवारी,अशोक दहिफळे,दत्ता कावरे, शाम नळकांडे,सचिन शिंदे, संदीप दातरंगे,मुन्ना भिगारदीवे,जेम्स आल्हाट,परेश लोखंडे आदी उपस्थित होते.


            यावेळी  डॉ अनिल आठरे म्हणले  सत्ताधाऱ्यांचा महिलां बाबतचा काय दृष्टिकोन आहे हेच समजत नाहीमहिला सुरक्षित नव्हत्या पण आत्ता अल्पवयीन मुली  सुरक्षित नाही,हि खेदाची बाब आहे,पोलिसांचा गुन्हेगारीवर वचक राहिला नाही,तर तर सत्ताधारी मतांसाठी फक्त लाडकी बहीण मध्ये व्यस्त आहे