व्यंकटेशवरला कल्याणम लग्नसोहळा संपन्न
अहमदनगर (प्रतिनिधी) :
सावेडी मधील श्रमिकनगर येथील श्रमिक बालाजी मंदिराच्या ३१ व्या वार्षिक महोत्सव निमित्त श्री व्यंकटेश वरला कल्याणम(बालाजी विवाह सोहळा)मोठ्या थाटात पार पडला.श्रमिक बालाजी सामाजिक संस्थेच्या वतीने सव्वा रुपयात जोडप्यांचा सामुदायिक विवाह लावण्यात आला.विवाहाकरीता नगरसह विविध ठिकाणाहून वधूवर आले होते यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मंदिराच्या वतीने आतापर्यत २१० सामुदायिक विवाह लावण्यात आले आहेत.
सकाळी सत्यनारायण महापुजा व होमहवन पुणाहुती करण्यात आले. पद्मशाली पुरोहित संघमने याचे पौराहित्य केले यावेळी राजु मामा जाधव, संजय बाले, रविंद्र कटारिया, जितेंद्र जग्गड, विवेक मुनोत(आनंद गॅस),सिध्दार्थ कटारिया, सतिषशेठ मुथा, विजय गणपत कारमपुरे(ठाणे),राहुलशेठ येमुल(पुणे), कैलासशेठ गुरुड(मुंबई), त्रिलेशशेठ येनगंदुल, कुशल मुनोत,अभि सापा(पुणे), संजय इरमल(पुणे), सागर पासकंटी(कलाक्षेत्रम, पुणे),अनिकेत मडुर, कुमार आडेप,दिगंबर कोंडा,अंकुश जयप्रकाश परदेशी, सतिषशेठ मुथा,आसाराम कावरे(अण्णा),विक्रम भैय्या राठोड,सुमित वर्मा,संभाजीराजे कदम,अनिल शिंदे,दिलीप सातपुते,योगिराज गाडे,सुमित कुलकर्णी,शहापुरे बंधु(पुणे), व्यंकटेश अरकल(पुणे), विजय येनगुपटला, संजय रच्चा आदी उपस्थित होते.
दुपारी श्रमिकनगर परिसरातून भगवान बालाजी पालखी(वरात)मिरवणुक वाद्यांसह काढण्यात आली.मिरवणुकीत महिला भजनी मंडळी टाळ घेऊन सहभागी झाले होते. ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करुन भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.नंतर वरला कल्याणम्(लग्न)साठीबालाजी बालदेव कल्याणम श्रीनिवास व वीणा बोज्जा,पद्मावती कल्याणम साठी इंजिनिअर सतिश व रोहिणी पागा,लक्ष्मी कल्याणम अरूणोदय मेडीकलचे उदय व वर्षा भणगे यांनी सपत्नीक विधीवत पूजा करुन बालाजी विवाह लावला.
संपुर्ण परिसर श्रीमन व्यंकटरमना गोविंदा गोविंदाच्या जय घोषाने दुमदुमले होते.विवाह सोहळ्यासाठी जिल्ह्यासह राज्याबाहेरुन भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरसेवक मनोज दुल्लम,धनजंय जाधव, महेंद्र गंधे, उदय कराळे,निलेश शेलाररवी दंडी,माळवदे महाराज,अरविंद पारगावकर,श्रीकांत गाडे ,राजेंद्र चोपडा,राजेंद्र पेवाल (इटॉन कंपनी),सुमतीलाल कोठारी सतिषशेठ मुथा,रविंद्रशेठ कटारिया,रमाकांत(नाना)गाडे,राजुशेठ जग्गड(महेंद्र पेडेवाला)आदीसह मान्यवर उपस्थित होते.विवाह सोहळ्यानंतर महाआरती होऊन महाप्रसादाच्या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली
.webp)
.webp)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com