कोठला परिसरात वाहनाच्या धडकेत नंदकिशोर परदेशी यांचे अपघाती निधन 

Accident News |  कोठला परिसरात वाहनाच्या धडकेत नंदकिशोर परदेशी यांचे अपघाती निधन


अहमदनगर : दर्शक ।


अहमदनगर शहरातील कोठला परिसरात पुणे-औरंगाबाद रोड वर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने नंदकिशोर माधव सिंह परदेशी यांचे निधन झाले नंदकिशोर परदेशी हे सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त अधिकारी होते.


 सकाळी साडेसहाच्या सुमारास पुणे ते औरंगाबाद रोडने डीएसपी चौकाच्या दिशेने जात असताना  ईदगाह मैदानाजवळ पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली त्यामुळे ते रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले.



 परिसरातील नागरिकांनी त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेले मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले याबाबतची माहिती भिंगार पोलीस यांना देण्यात आली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.


 नातेवाईकांनी फिर्याद दिल्यानंतर अज्ञात वाहन चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले अधिक तपास पोलिस अंमलदार महेश विधाते हे करीत आहेत.


अत्यंत मनमिळाउ स्वभाव आणि चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य असणारे नंदकुमार परदेशी यांचा अशा अपघातात अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या मागे एक मुलगा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर इंजिनियिर रोहन परदेशी ,एक मुलगी, सून नातवंड असा परिवार आहे. शुक्रवार ६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११:०० ला अमरधाम नालेगाव येथे अंत्यविधी करण्यात आला 


सा बा निवृत्त अभियंता अहमदनगर शहर  संघटनेचे ते पदाधिकारी होते या संघटनेतून अनेक सामाजिक काम ते नेहमी करत होते आणि शहरात मोठा मित्र परिवार होता दर्शक परिवाराशी त्यांचे अत्यन्त घनिष्ट संबंध होते दर्शक परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.   


 ईदगाह मैदान परिसरात पेट्रोलियम कंपनी गॅस पाईपलाईन असं काहीतरी खोदकाम सुरू असून त्यामुळे जागोजागी त्या खोदकाम करणाऱ्यांनी दोऱ्या बांधून खड्डे खोदून ठेवले आहे आणि यामुळे या ठिकाणी नेहमीच ट्रॅफिक जाम होत आहे याचाही तपास पोलिसांनी करणे गरजेचे झाले या कंपनीने पूर्व परवानगी घेतली आहे का वाहनांच्या वरदळी संदर्भात सुरक्षा व्यवस्था केली आहे का सर्व परवाने यांच्याकडे आहे का असे अनेक प्रश्न या अपघातामुळे निर्माण झाले आहे.