शेवटच्या श्रावणी सोमवार मुले सिद्धेश्वर महादेव मंदिरात दर्शनाला गर्दी
अहमदनगर : दर्शक ।
दिल्लीगेट येथील सिद्धीबाग मध्ये असलेल्या सिद्धेश्वर महादेव मंदिरात शेवटच्या श्रावणी सोमवार मुळे दर्शनाला भाविकांनी पहाटेपासून रात्री उशिरा पर्यंत दर्शनाला गर्दी केली होती तसे संपूर्ण श्रावण महिन्यात भाविक मोठ्या संख्नेने दर्शनाला येत होते.
पुरातन असलेले हे सिद्धेश्वर मंदिर सुंदर वास्तू लाकडी व दगडी बांधकामाने तयार झालेली आहे. इथे शिवलिंगाचा गाभारा हा तळघरात आहे. शांत व सौम्य आवाजात इथे महादेव भक्तीचा सतत गजर ऐकू येतो.शहरातील अनेक भाविकभक्त इथे भगवान शंकरांची नित्यसेवा करतात.
दरवर्षी श्रावणी सोमवारी आणि महशिवरात्रीच्या दिवशी नगरकर इथे मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेण्यासाठी येतात. मंदिराच्या आवारात प्रभू श्रीरामाचे, विठ्ठल रुक्मिणीचे, संत ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज तसेच अष्टभुजा देवी, शनि महाराज, मारुतीराया, श्री दत्त महाराज यांचेही मंदिरे आहेत. मंदिराचा परिसर अतिशय निसर्गरम्य व भक्तिमय आहे.
.webp)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com