पुण्यतिथीनिमित्त आज की शाम मुकेशजी के नाम.... कार्यक्रम संपन्न
अहमदनगर । दर्शक
भारतीय सिनेसंगित ज्या ज्या गायकांनी समृद्ध केले. त्यातील जेष्ठ गायक मुकेशचंद माथुर यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रसादजी शेटे यांच्या करावके ट्रॅकच्या माध्यमातून गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सावेडी जेष्ठ नागरिक मंच व प्रसादजी शेटे यांच्या संयुक्त विद्ममाने पुण्यतिथीनिमित्त आजकी शाम कुकेशजी के नाम...या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. यावेळी त्यांनी गायलेले अनेक गाणे यावेळी सादर करुन त्यांना सुरांची आंदरांजली वाहण्यात आली.
मुकेशजींची दर्दभरी गाणी अजूनही समाज मनावर ठसली आहे. त्यांच्या प्रत्येक गाण्यातून जीवनाचे तत्वज्ञान व आध्यात्मिक आशय दिसून येतो. एक प्यार का... नगमा है,. सजनरे झुट मत बोले, जिना जहाँ... मरना यहाँ...., कभी कभी मरे दिल में..., डम डम डिगा डिगा अशी एकापेक्षा एक सरस गाणे गाऊन प्रसाद शेठे यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली.
यावेळी मंचाचे शरद कुलकर्णी, मुरेश्वर मुळे, पुष्पा चितांबर, बलभिम पांडव, बाजीराव जाधव, चारुशिला करवंदे, हेमांगी पोतनिस, प्रकाश जोशी, रत्नाकर निसळ आदी उपस्थित होते.
यावेळी सभासदांनी फरमाईश केलेली गाणे सादर करण्यात आली. यावेळी गाण्यामागील इतिहास सांगून प्रत्येक गाणे सादर करण्यात आले. त्यामुळे या कार्यक्रमात आणखीन रंगत आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाजीराव जाधव यांनी केले. तर आभार मोरेश्वर मुळे यांनी मानले.
.webp)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com