Atishi | आतिशी मार्लेना दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ 

Atishi | आतिशी मार्लेना दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ




नवी दिल्ली  : दर्शक । 


आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल जामिनावर बाहेर आल्यानंतर जाहीर केल्याप्रमाणे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि आज आतिशी मार्लेना दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांची एकमताने निवड करण्यात आली. 



२१ सप्टेंबर शनिवार या दिवशी आतिशी यांना उपराज्यपालांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ दिली. आतिशी या आपच्या आमदार आहेत. अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात.


दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून आतिशी यांनी शपथ घेतली. त्यांच्यासह पाच आमदारांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. उपराज्यपालांच्या निवासस्थानी हा सोहळा पार पडला. आतिशी या दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरल्या आहेत. त्यांच्या शपथविधी सोहळ्याला अरविंद केजरीवाल यांच्यासह इतर प्रमुख नेते उपस्थित होते. 



१५ सप्टेंबर रोजी अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार हे जाहीर केलं होतं. त्यानंतर आम आदमी पक्षाच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याची चर्चा रंगली होती. पुढच्या दोन दिवसातच आतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मुख्यमंत्री म्हणून आता आतिशी यांनी शपथ घेतली आहे.



 


शपथ विधी नंतर मुख्यमंत्री अतिशी यांची पहिली पत्रकार परिषद