श्रावण पोळा उत्साहात साजरा; दातरंगे परिवाराने केले हिऱ्या व मोत्या बैलाचे पूजन
अहमदनगर : दर्शक ।
बैल मालक अनिल कारभारी दातरंगे यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बैलपोळा साजरा केला. नालेगाव नवग्रह मंदिर या ठिकाणी नेऊन मारुतीचे दर्शन घेतले व त्याचप्रमाणे पर्जन्येश्वर महादेव मंदिर दातरंगे मळा या ठिकाणी बैलांनी दर्शन घेतले
दातरंगे मळ्याला प्रदक्षिणा घालून थाटामाटात बैल जोडी घरी आणून त्यांची औक्षण पूजा करून बैलाला पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालून त्यांच्या दर्शन घेतले.
याप्रसंगी सर्व दातरंगे परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी गुलाब कारभारी दातरंगे, दत्ता बाळासाहेब दातरंगे,अशोक दातरंगे, अक्षय दातरंगे, अविनाश दातरंगे, स्वप्निल दातरंगे, आनंद दातरंगे, शुभम दातरंगे ,चंदन सूर्यवंशी, गणेश खंडागळे, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.webp)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com