Blood Donation Camp | शनेश्वर प्रतिष्ठानचे टिळक रोडला रक्तदान शिबिर संपन्न
अहमदनगर । दर्शक :
येथील शनेश्वर प्रतिष्ठान संचलित लोकमान्य टिळक मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सव निम्मित विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून यामध्ये आज स्वर्गवासी गणेश कानडे, सुनील कानडे व सारंग जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिर घेण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन माजी उपमहापौर अनिल बोरुडे, उद्योजक गोरखशेठ पडोळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोपट निमसे, मंडळाचे अध्यक्ष अक्षय गाडळकर,उपाध्यक्ष विकास कानडे,विनय गाडाळकर,लाभेश पडोळे,कृष्णा गाडळकर,श्रेयस पडोळे,रोहित पडोळे,साई कानडे,साहिल सय्यद,प्रसाद कानडे आदींसह युवक उपस्थित होते.
सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हे शिबिर घेण्यात आले होते.यामध्ये 45 जणांनी रक्तदान केले, रक्तदान हे न्यू अर्पण ब्लड बँक यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.यावेळी त्यांचे स्टाफ एस एस वैद्य, राहुल हुंबे, श्रीकांत पुजारी,प्रियंका बुड्डे ,सोनाली बोरकर,संध्या उरकुडे,सुधांश ठाकरे ,आरती खंदाते आदी उपस्थित होते.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com