Ganesh Utsav |  विक्रांत गणेश मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम व स्पर्धा तसेच देणगीदारांसाठी बक्षीस योजनेचे आयोजन


Ganesh Utsav | विक्रांत गणेश मंडळाच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम


अहमदनगर : दर्शक । 

विक्रांत गणेश मंडळ ट्रस्ट नगर शहरातील एक प्रथितयश असे मंडळ असुन मंडळातर्फे विविध धार्मीक, सामाजिक, सांस्कृतीक कार्यक्रम राबवण्यात आले आहे. गणेशोत्सव २०२४ निमित्त मंडळातर्फे या वर्षीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश उत्सवात आयोजित केलेल्या कार्यक्रम खालील प्रमाणे आहेत. 

  


     गणेश चतुर्थी भाद्रपद शु।। ४ शके १९४६ शनिवार दि. ०७/०९/२०२४, सायं. ७.३० वा.-"श्री पावन गणपती" प्रतिष्ठापना सोहळा सौ. तेजश्री व श्री. स्वप्निल कुलकर्णी (संचालक-आर.बी. कुलकर्णी तबलेवाले) यांचे हस्ते व मंडळाचे प्रधानाचार्य श्री अवधुत चंद्रशेखर जोशी (वांबोरीकर) यांचे पौराहित्याने संपन्न होईल.



       रविवार दि. ०८/०९/२०२४ रोजी सकाळी ९.३० वा.खुली चित्रकला स्पर्धा, सायं. ७.३० वा.चित्रकला स्पर्धा बक्षिस वितरण समारंभ श्री. प्रतिक कोळी साहेब (पोलिस उपनिरीक्षक, सायबर क्राईम विभाग) व डॉ. दत्तात्रय पोंदे (संचालक-सिनर्जी सायन्स अॅकॅडमी, अ.नगर,) यांच्या हस्ते तसेच श्री कोळी साहेब, श्री. पोंदे सर हे विद्यार्थी आणि पालकांना सोशल मिडीयाचा गैरवापर व ऑनलाईन गेम पासुन होणारे शैक्षणिक नुकसान, याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. 


मंगळवार दि. १०/०९/२०२४ रोजी सायं. ७.३० वा. सायं. आरती हस्ते सफाई कामगार, म.न.पा. अ.नगर, शुक्रवार दि. १३/०९/२०२४ रोजी सायं. ७.३० वा.-"शंकर महाराजांची बाललिला" या देखाव्याचे उद्घाटन हस्ते - "जय शंकर" मालिकेत शंकर महाराजांची भुमिका साकारणारे बालकलाकार चि. आरुष प्रसाद बेडेकर, 


शनिवार दि.१४/०९/२०२४ रोजी स. ७.३० वा.-शालेय विद्यार्थ्यांचे सामुहिक अथर्वशीर्ष पठण, सायं. ७.३० वा.-परिसरातील महिलांच्या हस्ते सामुहिक महाआरती, रविवार दि. १५/०९/२०२४ रोजी सायं. ७.३० वा.-अभियंता दिना निमित्त सायं. आरती हस्ते सौ. वंदना व श्री. योगेश चव्हाण कार्यकारी अभियंता शहर विभाग महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, अनंत चतुर्दशी मंगळवार दि. १७/०९/२०२४ दुपारी ३.०० वा.-"श्री पावन गणपती" ची महाआरती होऊन "श्रीं" ची विसर्जन मिरवणुक निघेल.



       त्याच बरोबर यावर्षी मंडळाच्या वतीने देणगीदारांसाठी भव्य बक्षिस योजनेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामधे २०/- रुपयाच्या देणगीमधे ५ भाग्यवान देणगीदारांना इलेक्ट्रीक स्कूटर, ३२" एल.इ.डी. टी.व्ही., एम.आय. मोबाईल, सोन्याची नथ आणि पैठणी साडी असे बक्षिस देण्यात येणार आहे. सर्व*गणेशभक्तांनी या बक्षिस योजनेचा तसेच मंडळाच्या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहनमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


  - गणेशोत्सव काळातील दैनंदिन कार्यक्रम - 

पहाटे ६:०० वा., सकाळी ६:३० वा. सनई वादन व भक्तीसंगीत श्री गणेश अथर्वशीर्ष पठण, सकाळी ७:०० वा. 'श्रीं' ची प्रातः आरती, सायं. ८:०० वा. 'श्रीं' ची सायं. आरती, 

      ज्या वर्गणीदारांना वर्गणी द्यावयाची असेल अशा गणेश भक्तांनी मंडळाच्या खात्यामध्ये ऑनलाईन जमा करु शकता. बँक डिटेल्स् नांव विक्रांत गणेश मंडळ (ट्रस्ट) बँक खाते क्र. : बँक ऑफ महाराष्ट्र : 20158766317 IFSC CODE: MAHB0000576 वरील सर्व कार्यक्रमांचे आपल्या लोकप्रीय दैनिकातुन प्रसिद्धी करण्यात यावी. यापूर्वीही आपण आपल्या दैनिकामधुन आमच्या मंडळाची प्रसिद्धी करून आम्हाला सहकार्य केले आहे. यावर्षीही तसेच सहकार्य करुन आमच्या कार्यास उत्तेजन द्यावे हि नम्र विनंती.