Ganesh Utsav | सिद्धेश्वर तरुण मंडळाची गणेश स्थापना मिरवणुकित रथ ठरला लक्षवेधक
अहमदनगर । दर्शक
येथील जंगूभाई तालीमच्या सिद्धेश्वर तरुण मंडळ वतीने गणेश उत्सवा निमित्त गणेश स्थापना मिरवणूक शहरातून काढण्यात आली होती, यामध्ये गणेश रथ सर्वांचे आकर्षण ठरला तर मिरवणूक लक्षवेधक ठरली.
तोफखाना येथील मूर्तीकार किशोर रोकडे यांच्या निवास्थानी पूजा करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.मिरवणुकीत आकर्षक अश्या रथावर गणेशाची स्थापना करण्यात येऊन मिरवणुकीस प्रारंभ झाला मिरवणुकीत मंडळाचे अध्यक्ष राजूमामा जाधव,युवा नेते ऍड धनंजय जाधव,सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू जाधव,उद्योजक आदिनाथ जाधव,आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मिरवणुकित आतषबाजी करून पेपर ब्लास्ट करण्यात आले,शेकडो कार्यकर्ते वाद्याच्या तालावर नाचत सहभागी झाले होते शितलादेवी चौक,बागडपट्टी,चितळे रोड,चौपाटी कारंजा,दिल्लीगेट, सिद्धीबाग मार्गे मिरवणूक मंडपात येऊन गणेशाची विधिवत स्थापना करण्यात आली.
.webp)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com