Baba Siddiqui | बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे

 Baba Siddiqui | बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे

Baba Siddiqui | बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे



Baba siddique Murder Case : पोलिसांच्या (Mumbai Police) चौकशीतून राष्ट्रवादी नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येप्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिसांनी आरोपींची चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी हरियाणाच्या जेलमध्ये एकत्र होते. फरार आरोपीचं नाव शिवा कुमार असून तिघेही 2 सप्टेंबर रोजी मुंबईत आले होते. मागच्या महिन्यात तिघेही जुहू बीचवर गेले असताना त्यांनी आठवण म्हणून फोटो काढले होते. यातील एका आरोपींच्या मोबाइलमध्ये हा फोटो सापडल्याने इतर सर्व आरोपींची ओळख पटवणं सोपं झालं आहे. 

Baba Siddiqui | बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे



दरम्यान, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपींकडून 28 जिवंत काडतूसं दोन मोबाईल जप्त केले आहेत. यातील एक मोबाइल हा फक्त कॉलिंगसाठी होता तर दुसरा नियमित वापरासाठी असल्याची माहिती तपासात समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्राथमिक तपासात तिघांवरही गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याचा पोलिसांना संशय आहे. 


न्यायालयाकडून एका आरोपीला पोलिस कोठडी, दुसऱ्या आरोपीचे वय तपासण्याचे आदेश 

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणात आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर आज (दि.13) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, न्यायालयात हजर केल्यानंतर दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे. सरकारी वकील म्हणाले, आरोपीच्या आधार कार्डवर त्याचं वय 19 आहे, मात्र तो 17 आहे म्हणत आहे. आरोपींच्या वकिलाकडे वयाबाबत कोणतेही पुरावे नाहीत. आरोपी अशा गुन्ह्यात अनेकदा स्वत:च्या बचावासाठी बनावट आधारकार्डही बनवतात, असा दावाही सरकारी वकिलांनी न्यायालयात केला आहे. 


टेस्ट केल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर करण्याचे आदेश 

दरम्यान, सरकारी वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर आरोपी वया खुलासा करण्यासाठी वैद्यकिय चाचणी करण्यास तयार झाला. त्यामुळे न्यायालयाने आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद गांभिर्याने घेत त्याचे वय तपासण्यासाठी टेस्ट करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय टेस्ट झाल्यानंतर आरोपींना परत एकदा न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी मोठे धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दोन आरोपींना राजेंद्र दाभाडे या पोलिस अधिकाऱ्याने पकडले

 बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना राजेंद्र दाभाडे या पोलिस अधिकाऱ्याने पकडले. राजेंद्र दाभाडे हे मुंबईतील निर्मल नगर ठाण्यामध्ये एपीआय असून त्यांनी जीवाची बाजी लावून दोन्ही आरोपींना पकडलं आहे. 

बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाला त्यावेळी राजेंद्र दाभाडे हे त्या ठिकाणी देवी विसर्जनासाठी बंदोबस्तासाठी तैनात होते. बाबा सिद्दिकींवर गोळीबार होताना पाहिल्यानंतर एपीआय राजेंद्र दाभाडे यांनी आरोपीच्या हातात बंदूक असताना देखील धाडस दाखवलं आणि दोन आरोपीना पकडले. यातील एक आरोपी हा गर्दी आणि फटाक्यांच्या धुराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला. 

सध्या बाबा सिद्दीकी गोळीबार प्रकरणांमध्ये मुंबई गुन्हे शाखेची टीम अधिक तपास करत आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेकडून 15 टीम तयार करण्यात आल्या आहेत.

बाबा सिद्दिकींची हत्या लॉरेन्स बिष्णोई गँगनं केली का याचा तपास मुंबई पोलिस करत आहेत.  बाबा सिद्दिकींना वाय दर्जाची सुरक्षा नव्हती, त्यांना नेहमीची सुरक्षा असून त्यांच्या सुरक्षेत तीन पोलिस कॉन्स्टेबल तैनात होते असंही मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलंय.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या